संपादकीय

आकाश बाफना यांच्या पुढाकारातून सावळेश्वर कॉलनीत मुरूम टाका अभियान सुरू!

जामखेड – शहरातील सावळेश्वर कॉलनी (काटकर वस्ति) परिसरात पावसाळ्यामुळे झालेल्या चिखलामुळे नागरिकांना मोठा गैरसोयचा सामना करावा लागत होता. अनेकदा जामखेड नगर परिषदेकडे अर्ज दिले तरी कोणतीही दखल घेतली गेली नाही.

याच पार्श्वभूमीवर आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांनी आज स्वतः घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या मागणीवर मुरुमीकरणाचे काम सुरू केले. या यामुळे परिसरातील नागरिकांचा मार्ग सुकर झाला आहे.यावेळी बोलताना बाफना म्हणाले की,कोणालाही कुठेही मदतीची गरज भासल्यास किंवा नागरिकांच्या समस्या उद्भवल्यास त्वरीत आदर्श फाऊंडेशनशी संपर्क साधावाअसे मी आवाहन करतो. नागरिकांचे सहकार्य व कौतुक आम्हाला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देते.

यावेळी नागरिकांनी आकाश बाफना यांच्या कार्याची प्रशंसा करत, मानाचा फेटा बांधून, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.

चौकट

प्रत्यक्ष भेटीगाठीने काम करणारा युवा नेता

शहरासह नगरपरिषदेच्या हद्दीत सात वाड्या-वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्वरित उपाय करणारा बाफना परिवारातील तडफदार युवा नेता आकाश बाफना सध्या लोकांच्या जवळचा नेता म्हणून चर्चेचा विषय ठरला आहे.सामाजिक वारसा लाभलेला हा परिवार विविध सामाजिक कार्यांमधून प्रसिद्ध असून, लोकांच्या पसंतीस उतरणारा उपक्रम शहरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Back to top button