संपादकीय

इंजिनिअर हा आधुनिक जगाचा पाया – प्रा. विकी घायतडक

डिप्लोमा काॅलेज येथे पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साहात संपन्न

जामखेड प्रतिनिधी : आजच्या विद्यार्थ्यांनी स्वतः ला तंत्रज्ञाना बरोबर जोडले पाहिजे. छोटे छोटे प्रोजेक्ट तयार करा, जगाच्या पाठीवर कुठेही जा इंजिनिअर क्षेत्राची ताकद मोठी आहे. इंजिनिअर हा आधुनिक जगाचा पाया असून इंजिनिअर चा वापर चांगल्या गोष्टी शिकवतो. संस्काराची जोड असणे आवश्यक आहे. देशहीतासाठी काम करा, राष्ट्रचे नाव घडवा. असे प्रतिपादन प्राचार्य विकी घायतडक यांनी केले.

आज शहरातील दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक जामखेड येथे भारतरत्न डॉ. मोक्षगुंड्म विश्वेशरय्या यांच्या जयंतीनिमित्त जागतिक अभियंता दिनानिमित्ताने पोस्टर प्रेझेंटेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व भारतरत्न डॉ. मोक्षगुंड्म विश्वेशरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. पर्जन्य परिस्थितीमुळे सदर कार्यक्रम आज रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या पोस्टर प्रेझेंटेशन कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणून डिप्लोमा काॅलेज चे प्राचार्य विकी घायतडक,जामखेड महाविद्यालयाचे प्रा. संजय राऊत तसेच जय घायतडक यांनी काम पाहिले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.यामध्ये
इलेक्ट्रीकल इंजिनिअर

प्रथम पारितोषिक – सागर पवार
द्वितीय पारितोषिक – ओमकार जमदाडे
तृतीय पारितोषिक – तनुजा कांबळे

काॅम्प्युटर इंजिनिअर

प्रथम पारितोषिक – वैष्णवी माने
द्वितीय पारितोषिक – ईरम तांबोळी
तृतीय पारितोषिक – आविष्कार तिकोरे, सार्थक निमोणकर

सिव्हिल इंजिनिअर

प्रथम पारितोषिक – कोकाटे गौरव
द्वितीय पारितोषिक – सुरज आहेर
तृतीय पारितोषिक – ऋषिकेश मेंगडे
आदींनी यश संपादन केले.

यावेळी दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार, प्रा. किशोर हुंबे, प्रा. जयसिंग पवार, प्रा. विजय कोकाटे, प्रा. पूनम कांबळे, प्रा. प्रियांका पवार, प्रा. शुभदा भोज, प्रा. आश्विनी पोटफोडे, वरिष्ठ लिपिक सविता सुतार, लिपिक संतोष जगताप, प्रतिक उदारे, सौरभ पवार आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थिनी फिरदोस पठाण, दिपाली गोपाळघरे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. जयसिंग पवार यांनी मानले. पोस्टर प्रेझेंटेशन कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

Back to top button