बीड

सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत भाजपाचे तपनेश्वर येथे भव्य आरोग्य शिबीराचे उद्घाटन

सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत भाजपाचे तपनेश्वर येथे भव्य आरोग्य शिबीराचे उद्घाटन

मोहन पवार यांचे आवाहन – शिबिराचा लाभ घ्या !

जामखेड प्रतिनिधी -देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित सेवा पंधरवडा २०२५ उपक्रमांतर्गत जामखेड शहरातील तपनेश्वर भागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीराचे उद्घाटन भाजपा जेष्ठ नेते मधुकर राळेभात यांच्या हस्ते करण्यात आले तर बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले भाजपा शहर मंडल अध्यक्ष संजय काशिद,जेष्ठ प्रविण चोरडिया,शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा. संजय राऊत, सुरेश जाधव,नगरसेवक मोहन पवार, दिगांबर चव्हाण, राजेश वाव्हळ,पवन राळेभात,गणेश आजबे, आकाश बाफना,युवा नेते मोहन देवकाते, प्रविण होळकर, प्रविण बोलभट, तात्याराम पोकळे,लहुशेठ पवार, शिवकुमार शर्मा,विक्रांत घायतडक,आण्णासाहेब ढवळे, बाळासाहेब गायकवाड,अर्जुन म्हेत्रे, अनिकेत जाधव, शिवाजी येवले, गणेश मासाळ, नामदेव गंगावणे, राजेश्री पवार, संगिता पारे, रूक्साना पठाण, मिरा तंटक आदी मान्यवरांसह नागरिक व रूग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने जामखेड शहरातील तपनेश्वर भागात आयोजित आरोग्य शिबीराचा रूग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते मोहन पवार यांनी केले आहे.
तपनेश्वर रोडवरील ढवळे किराणा जवळ सुरू असलेल्या या शिबीरात डॉ. अमित पाळवदे M.B.B.S. DORI DNB (कान नाक घसा तज्ञ), डॉ. भरत दारकुंडे ICU Intensivist (मॅनेजिंग डायरेगक्टर), डॉ. अक्षय क्षीरसागर M.B.B.S. D.ortho FIJR (अस्थिरोग तज्ञ) डॉ. सौ. पोर्णिमा अमित पाळवदे BDS (दंत रोग तज्ञ), डॉ. प्रशांत जाधव M.B.B.S. MD Medicine (हृदय रोग व मधुमेह तज्ञ), डॉ. अशोक बांगर B.M.H.S. (आरोग्य तज्ञ) हे आरोग्य सेवा देत आहेत. तर सोमनाथ राळेभात प्रवीण चोरडिया उद्धव हुलगुंडे. भा. ज. पा शहर मंडल व भाजपा तपनेश्वर गल्ली,
जामखेड हे या शिबीराचे संयोजक आहेत.

Back to top button