बीड
महावितरणच्या कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांचे निलंबन करून कारवाई करण्यात यावी- पत्रकार संघटनेची मागणी

महावितरणच्या कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांचे निलंबन करून कारवाई करण्यात यावी- पत्रकार संघटनेची मागणी
केज/प्रतिनिधी :-केज येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांचे निलंबन करून कारवाई करण्यात यावी अशी लेखी निवेदनाद्वारे केज येथील पत्रकार संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्याकडे मागणी केली आहे.
बातमी प्रकाशित केल्याचा राग मनात धरून कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांनी सोशल मीडिया वरून स्वतःच्या मोबाईलवर स्टेटस ठेवून पत्रकाराची बदनामी व वैयक्तिक भावना दुखावल्या आहेत या प्रकरणी केज येथील पत्रकार संघटनेच्या वतीने केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे, तहसीलदार केज, उपअभियंता महावितरण कार्यालय उपविभाग केज यांना निवेदनाच्या प्रती देऊन कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांचे निलंबन करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांनी स्वतःच्या मोबाईलवर स्टेटस ठेवून पत्रकार *”गोल टोपीवाला”* पत्रकार वीज चोर असा अपमानास्पद स्वतःच्या मोबाईलवर मजकूर ठेवून जिम्मेदार कर्मचारी कनिष्ठ अभियंता यांनी आमच्या सहकारी पत्रकाराचा अवमान व सामाजिक भावना दुखवतील अशा आशयाचे प्रयत्न केल्यामुळे सदरील कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांचे निलंबन करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे व मागणीचे पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे. या लेखी निवेदनावर ज्येष्ठ पत्रकार हनुमंत भोसले, धनंजय कुलकर्णी, अशोक सोनवणे, दशरथ चवरे, वसंत सोनवणे, तात्या गवळी, विजय अरखडे, अनिल ठोंबरे, अशोक नागरगोजे, साजेद इनामदार, दीपक नाईकवाडी, संजय खळगे, प्रकाश मुंडे, पांडुरंग कसबे, आय.एन.शेख, मुबाशीर खतीब, दिनकर राऊत, बाळासाहेब जाधव, अर्षद शेख, अजिमभाई इनामदार, नंदकुमार मोरे, रमेश इतापे इत्यादी पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
चौकट:-
महावितरण कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांनी स्वतःच्या मोबाईलवर टोपीवाला पत्रकार, बीजली चोर पत्रकार अशा आशयाचे व सदर मजकुराचे स्टेटस ठेवून पत्रकार बांधवांच्या व मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखवून पत्रकारितेचा अवमान केल्याप्रकरणी पत्रकार मुबाशीर खतीब हे २ सप्टेंबर २०२५ रोजी संबंधित कनिष्ठ अभियंता यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासह विविध मागणी संदर्भात महावितरण कार्यालय उपविभागीय येथे आमरण उपोषणाला बसणारा आहेत तर त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देऊन केज येथील प्रत्येक पत्रकार संघाचा दररोज पाठिंबा देऊन साखळी उपोषण करण्याचे शासकीय विश्रामगृह येथे केज येथील पत्रकार बांधवांनी बैठक घेऊन सदर बैठकीत वरील प्रमाणे ठरवले आहे.



