बीड

सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांतून संघर्ष मंडळाची वेगळी ओळख – नगरसेवक अमित चिंतामणी

सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांतून संघर्ष मंडळाची वेगळी ओळख – नगरसेवक अमित चिंतामणी
जामखेडमध्ये मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा – नगरसेवक अमित  चिंतामणी यांच्या हस्ते
जामखेड – सालाबादप्रमाणे याही वर्षी शहरातील संघर्ष मित्र मंडळ, कोर्ट गल्ली येथील मानाचा गणपती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने विराजमान झाला. गणरायाची प्राणप्रतिष्ठा जामखेड नगरपरिषदेचे कार्यतत्पर नगरसेवक माननीय अमित  चिंतामणी यांच्या हस्ते करण्यात आली.
या सोहळ्यात प्रथम आरतीचा मान मंडळाच्या वतीने नगरसेवक चिंतामणी यांना देण्यात आला. यावेळी संघर्ष मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना नगरसेवक अमित चिंतामणी म्हणाले की,गेल्या अनेक वर्षांपासून मंडळ विविध सांस्कृतिक, धार्मिक, देशभक्तीपर कार्यक्रमांद्वारे आपली वेगळी ओळख जपून आहे.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button