बीड
होळ येथे आयपीएस अंकुशराव शिंदे यांचा रविवारी होणार सेवापूर्ती सन्मान सोहळा

होळ येथे आयपीएस अंकुशराव शिंदे यांचा रविवारी होणार सेवापूर्ती सन्मान सोहळा
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे ग्रामस्थांचे आवाहन
केज (प्रतिनिधी)दि.१४ : तालुक्यातील होळचे सुपुत्र, राज्याच्या व्हीआयपी सुरक्षा विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक अंकुशराव शिंदे यांनी सेवानिवृत्तीला ४ महिने शिल्लक असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. यानिमित्ताने त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा होळ येथे रविवारी (दि.१७) सकाळी १०.३० वाजता हनुमान मंदिरात ग्रामस्थांच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनीताई शिंदे ह्या असतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राजस्थानचे माजी मुख्य न्यायमूर्ती संभाजीराव शिंदे, मांजरा कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक दत्तासाहेब शिंदे, माजी सरकारी वकील अॅड.प्रकाश शिंदे, माजी अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, पुणे सीआयडीचे पोलीस उपाधीक्षक दीपक शिंदे, नागपूरचे महावितरण कंपनीचे माजी मंडळ अभियंता लक्ष्मण खाडे, गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, केंद्रप्रमुख रमेश कांबळे, प्रा.डॉ.ज्ञानोबा सरवदे, बारामती अॅग्रोचे प्रबंधक अंकुश ढवारे, मुख्याध्यापक धर्मराज शिंदे, हृदयरोग तज्ञ डॉ.नवनाथ घुगे, डॉ.गणेश ढवारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन सर्व ग्रामस्थांनी केले असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेवानिवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक अंकुशराव शिंदे यांच्या कार्याचा गौरव करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. दरम्यान, होळच्या मातीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा गावासाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.



