बीड
चकलांबा हद्दीत एपीआय राजेश गडवे यांचा अवैध व्यवसायीकांना पुन्हा दणका

चकलांबा हद्दीत एपीआय राजेश गडवे यांचा अवैध व्यवसायीकांना पुन्हा दणका
वाळूच्या टिप्परसह चालकाच्या आवळल्या मुसक्या.
२५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कोळगाव ( प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार एपीआय राजेश गडवे यांनी अवैध धंद्यावर कारवाई करत व्यावसायिकांना सळो कि पळो करुन सोडले असतांना परत त्यांनी वाळूचा टिप्पर पकडून २५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन टिप्पर चालकास ताब्यात घेतले असुन हि दमदार कामगिरी बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत ,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एपीआय राजेश गडवे, पोलीस हेडकॉन्स्टेबल
अमोल येळे हे .दि ५ ऑगस्ट २०२५ रोजी खाजगी वाहनाने पोलीस ठाणे हद्दीत रात्रगस्त व अवैध धंद्यावर केसेस करणे कामी पेट्रोलिंक करत असतांना त्यांनी टाटा कंपनीचा टिप्पर एम .एच.१७ ही.व्ही१८९१ हा घोगसपारगाव मध्ये भगवानगड ते मातोश्री चौकामध्ये अडवून चालकास वाळू वाहतूक परवाना बाबत विचारणा केली असता चालकाकडे कसलीच कागदपत्रे नसल्यामुळे एपीआय राजेश गडवे यांनी दोन पंचासमक्ष सदरील टिप्पर ताब्यात घेऊन टिप्पर व वाळू असा एकूण २५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चकलांबा पोलीस ठाण्यात टिप्पर चालक नवनाथ प्रल्हाद खोपडे रा.मुंगी ता.शेवगाव जि.अहिल्यानगर यांच्यावर पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल येळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



