बीड

जिल्हा वाहतुक शाखेची नेकनूर परिसरात कारवाई 109 केसेस करुन 73 हजाराचा ठोठावला दंड

जिल्हा वाहतुक शाखेची नेकनूर परिसरात कारवाई
109 केसेस करुन 73 हजाराचा ठोठावला दंड
बीड (प्रतिनिधी)-बीड जिल्हा वाहतुक शाखेच्या वतीने पोलीस अधिक्षक नवनीत, अप्पर अधिक्षक सचिन, जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी सुभाष, नेकनूर पोलीस स्टेशनचे गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली नेकनूर येथे आज आठवडी बाजार असल्याने बसस्टॅण्ड वरल मुख्य रस्त्याचा परिसरात वाहतुकीस अडथळा आणणार्‍या व वाहन नियमांचे उल्लंघन करणार्‍या 109 वाहनधारकांवर कारवाई करुन 73 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला व एकाविरुद्ध लायसन निलंबन प्रस्ताव पाठविण्याची तजवीज ठेवली आहे. वाहतुक शाखेने केलेल्या या कार्यवाहीमुळे बेकायदेशीर वाहनधारकांची धांदल उडाली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा वाहतुक शाखेने आज विशेष मोहीम अंतर्गत नेकनूर परिसरात बेकायदेशीर वाहन धारकांना लगाम लागावा व वाहनाच्या नियमामध्ये सातत्य राहावे या हेतूने पोलीस उपनिरीक्षक विजय यांच्या सहकार्यांने सकाळी 10 वाजण्याच्या  सुमारास नेकनूर परिसरात आज आठवडी बाजाराचा दिवस असल्याने रस्त्यावरील नो पार्कींग वाहनांवर व रस्त्यावर वाहने उभे करुन वाहतुकीस अडथळा आणणार्‍या वाहनांवर तसेच विमा नसणे, पीयुसी नसणे, लायसन्स नसणे, हेल्मेट नसणे या सदराखाली 109 वाहनधारकांवर कारवाई करुन 73 हजार रुपये दंड ठोठावला असून नियमभंग करणार्‍यांवर पोलीस कारवाई करण्यात आली आहे. या कामीच पोलीस उपनिरीक्षक विजय यांच्यासह पोलीस हवालदार सखाराम, पोलीस नाईक आदिनाथ, पोलीस अंमलदार टुले, शेख, नेकनूर पो.स्टे.चे खाडे व कदम, पोलीस ड्रायव्हर नारायण यांनी सहभाग नोंदवला तसेच विनाकागदपत्रे वाहने चालवू नका, वाहनांचे नियम पाळा, वाहतुकीस विनाकारण अडथळा करु नका असे आवाहन जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी सुभाष यांनी केेले आहे.
Back to top button