मराठवाडा नेते प्रविण रणबागुल यांची जामखेडला सदिच्छा भेट; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीतीवर चर्चा

मराठवाडा नेते प्रविण रणबागुल यांची जामखेडला सदिच्छा भेट; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीतीवर चर्चा
जामखेड, दि. २० जुलै २०२५ (प्रतिनिधी):वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा नेते तथा उद्योजक प्रविण रणबागुल यांनी आज जामखेड येथे ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या उपस्थितीत त्यांचा भारतीय संविधानाची प्रत, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
आगामी काळात जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. या बैठकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी भाजपा वगळता इतर समविचारी पक्षांशी युती करण्याची भूमिका स्पष्ट केल्याची माहिती तालुकाध्यक्ष आतिश पारवे यांनी दिली.
या संवाद बैठकीत तालुकाध्यक्ष आतिश पारवे, आदिवासी नेते विशाल पवार, ऋषिकेश गायकवाड, सोशल मीडिया प्रमुख राजू शिंदे, शंकर पवार, ईश्वर पवार, राहुल काळे, माणिक काळे, शिवाजी पवार, अशोक पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या दौऱ्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या जामखेड तालुक्यातील संघटनात्मक हालचालींना चालना मिळण्यास सुरुवात झाली आहे.



