📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

सुनील उभे याच्या सोशल मीडिया पोस्ट विरोधात जामखेड येथे निवेदन

सुनील उभे याच्या सोशल मीडिया पोस्ट विरोधात जामखेड येथे निवेदन

होळकर समिती सदस्यांचा इशारा – कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन – पांडुरंग माने

जामखेड, १९ जुलै २०२५ (प्रतिनिधी) –पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह व असभ्य भाषेत पोस्ट व कमेंट सुनील गोपाळराव उभे यांनी केली असून या प्रकरणी तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराजा यशवंतराव होळकर राज्यभिषेक सोहळा समितीचे सदस्य पांडुरंग माने यांनी केली.

या मागणीसंदर्भात आज दिनांक १९ जुलै रोजी जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना पांडुरंग माने म्हणाले की, “अहिल्यादेवी होळकर या समस्त जनतेच्या श्रद्धास्थान आहेत. त्यांच्याविषयी केलेली ही पोस्ट संपूर्ण समाजाच्या अस्मितेवर घाव आहे.अहिल्यादेवींवर बोलणाऱ्यांना समाज धडा शिकवेल,समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, जातीयतेला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रकाश काळे, उमेश राळेभात, नितीन राऊत, विनोद टकले, गणेश खराडे, संतोष खरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button