उद्या वसंतराव काळे महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

उद्या वसंतराव काळे महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यशाळा
पोलीस अधीक्षक मा. नवनीत कांवत यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन
बीड दि. 17 (प्रतिनिधी) आज स्पर्धेच्या आणि गतिमान युगात विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवड करण्यासाठी व्यापक मार्गदर्शन व्हावे म्हणून “आय टी क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी” या विषयावर पुणे येथील आयटी क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शनपर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, येथील वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय बीड आणि संभाजी राजे ग्रंथालय व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने “आयटी क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे दिनांक: 19 जुलै 2025 वार शनिवार सकाळी:10:30 ते 03:30 वा. या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी 10:30 वा. बीड पोलीस अधीक्षक मा. श्री. नवनीतजी कांवत साहेब यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष मा. श्री. रमेश भाऊ पोकळे तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. श्रीकांतजी डिसले सहाय्यक पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर तर प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री. तेजाजी शिंदे उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत पुणे येथील आयटी क्षेत्रातील तंज्ञ मार्गदर्शक मा. श्री. हिरेनजी केशरिया सीईओ वायर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे मा. श्री. गिरीषजी साळुंखे प्रकल्प व्यवस्थापक मा. श्र. निमीषजी हागे, मा. श्री. राहुलजी भालेराव, मा. श्री. गिरीशजी केळकर, मा. डॉ.श्री. रविंद्रजी खेडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन होणार आहे.
या कार्यशाळेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील करिअरचे मार्ग,अत्याधुनिक उद्योग ट्रेंड, अनुभवी व्यावसायिकांद्वारे वैयक्तिक करिअर समुपदेशन होणार आहे. तसेच या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर निवड करण्यासाठी योग्य निर्णय क्षमता वाढण्यास देखील मार्गदर्शन होणार आहे. तेंव्हा विद्यार्थी- विद्यार्थिनींनी तसेच पालकांनी आणि आयटी क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान महाविद्यालय संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



