📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी समन्वय आवश्यक – डॉ. संजय भोरे

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी समन्वय आवश्यक – डॉ. संजय भोरे

पुणे शिक्षण विभागाचे उपसंचालक गणपत मोरे यांचा डॉ. संजय भोरे आणि अस्मिता जोगदंड यांच्या हस्ते सन्मान

जामखेड/ प्रतिनिधी:-पुणे शिक्षण विभागाचे नवनियुक्त उपसंचालक गणपत मोरे यांचा नुकताच पुणे येथे सन्मान करण्यात आला. तालुका शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष आणि सनराईज मेडिकल अ‍ॅण्ड एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे तसेच संकुलाच्या सचिव व प्राचार्या सौ. अस्मिता जोगदंड-भोरे यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला.

या वेळी बोलताना डॉ. संजय भोरे यांनी, शिक्षक, पालक आणि प्रशासन यांच्यातील सुसंवाद आणि समन्वयातूनच गुणवत्तापूर्ण शिक्षण घडवता येते, असे मत व्यक्त केले. मोरे यांच्या शैक्षणिक कार्यातील योगदानाची दखल घेत त्यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Back to top button