बीड

गोर गरिबांच्या लेकरासाठी संघर्ष करणारे मेटे साहेब- राजेंद्र आमटे 

गोर गरिबांच्या लेकरासाठी संघर्ष करणारे मेटे साहेब- राजेंद्र आमटे
खांडे पारगाव येथे मेटे यांच्या जयंती निमित्त अभिवादन
बीड / प्रतिनिधी :  सर्व सामान्य घरातून संघर्ष करत महाराष्ट्राच्या पटलावर बीड जिल्ह्याच नाव कोरणारे बहुजन नायक लोकनेते विनायकराव मेटे यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोर गरिबांच्या लेकरासाठी विविध प्रश्नांवर संघर्ष केला असे गौरव उद्गार शिवसंग्राम शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांनी काढले.
 बीड तालुक्यातील खांडे पारगाव येथे माजी आ. विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात राजेंद्र आमटे बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकरी कर्ज माफी साठी सर्वात मोठा मोर्चा शेगाव येथे मेटे यांनी काढला. शेतकरी शेतमजूर पेन्शन योजना राबवण्यात यावी हि मुख्य भूमिका मेटे यांनी घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वात मोठ्या लढा दिला. सारथी संस्थेच्या स्थापनेत सिंहाचा वाटा उचलला, खुल्या प्रवर्गातील नोकर भरती वय मर्यादा वाढवायचं काम मेटे यांनी केले. सर्व सामान्य घरातून संघर्ष करून गोर गरिबांच्या लेकरासाठी आयुष्य वेचणारे एकमेव नेते होते, असे प्रतिपादन राजेंद्र आमटे यांनी केले.
        खांडे पारगाव येथे लोकनेते विनायकराव मेटे यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी विनायकराव मेटे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या वेळी शिवसंग्राम शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, हरिभाऊ आमटे, आत्माराम आमटे, महादेव आमटे, नवनाथ बापू, अनिल पाटील, सुनील आमटे, बाबासाहेब सुरवसे, बापुराव सपकाळ, लहू आमटे, संतोष आमटे, नवनाथ सोळुंके, ऋषिकेश आमटे, विष्णू वाघमारे, सुदाम ठोकळ सह आदी उपस्थित होते.
Back to top button