बीड
परशुराम प्रतिष्ठानतर्फे तपनेश्वर येथे संत वामनभाऊ दिंडीचे स्वागत व प्रसाद वाटप

परशुराम प्रतिष्ठानतर्फे तपनेश्वर येथे संत वामनभाऊ दिंडीचे स्वागत व प्रसाद वाटप
जामखेड प्रतिनिधी – पारंपरिक टाळ मृदुंगाच्या गजरात, भगव्या पताकांच्या साक्षीने, हरिपाठ आणि भजनाच्या भक्तीमय वातावरणात श्री संत वामनभाऊ पालखी व दिंडीचे जामखेड शहरात तपनेश्वर येथे परशुराम प्रतिष्ठान,जामखेड यांच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच वारकऱ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी सुंदर (काका) देशमुख ,सचिन देशमुख विजय कुलकर्णी ,बापूसाहेब कुलकर्णी ,प्रमोद दाणी,सुहास देशमुख गणेश जोशी ,लक्ष्मीकांत काळे, हर्षल देशमुख ,प्रमोद कुलकर्णी ,सचिन दाणी ,सतिष काळे ,मोहन डाडर तसेच माता भगिनी व पत्रकार उपस्थित होते.



