बीड

‘ फार्मसी: भविष्यातील अग्रणी नामांकित करिअरची संधी’

‘ फार्मसी: भविष्यातील अग्रणी नामांकित करिअरची संधी’

माजलगाव प्रतिनिधी :-आपल्याला निरोगी ठेवण्यात आणि विविध रोगांवर उपचार करण्यात डॉक्टरांसोबतच फार्मासिस्टचीही मोठी भूमिका आहे. फार्मासिस्ट म्हणजेच औषधनिर्माता ही अशी व्यक्ती आहे ज्याला औषधांबद्दल संपूर्ण माहिती असते. भारतात औषधांची समृद्ध बाजारपेठ आहे उच्च दर्जाची औषधे उत्पादन करण्यात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. जगाला लागणारी ८० टक्के औषधे भारतात तयार होतात. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन मान्यता प्राप्त कंपन्या अमेरिकेनंतर सर्वात जास्त भारतात आहेत. स्वस्त औषध निर्मितीमध्ये भारत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे जगाची फार्मसी म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे.
आधुनिक औषधे अत्यंत प्रभावी, कमी मात्रेतही गुणकारी, त्वरित परिणाम करणारी पण घातक दुष्परिणामही असलेली. योग्यपणे वापरली तर अमृत, अन्यथा विषारी. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ओषधांचेच प्रकारही (डोसेज फॉर्मस) नवनवीन विकसित होत गेले. डॉक्टर रोगनिदान व उपचारांत तज्ञ, तर फार्मासिस्ट हा औषधतज्ञ त्यामळे फार्मासिस्टची रूणाभिमख भूमिका विकसित व विस्तारीत होत गेली. जागतिक आरोग्य संघटनेनेही या भूमिकेवर शिक्कामोर्तच केले. फार्मासिस्ट हा डॉक्टरांना पुरक व आरोग्य सेवेतील महत्वाचा घटक झाला. बहुतांशी देशांत आज फार्मासिस्ट ओषध व आरोग्याविषयक समुपदेशन, प्रिस्क्रिप्शनची पडताळणी, दूष्परिणाम व औषध आंतरक्रिया टाळण्यासाठी रुणांना/ डॉक्टरांना सल्लामसलत करतात तसेच रक्तशर्करा, रक्तदाबसारख्या तपासण्या अशा अनेकविविध सेवा रूणांना देत आहेत. विशेष प्रशिक्षित फार्मासिस्ट तर औषधे लिहून देण्याचे किंवा कन्सल्टिंग करण्याचे काम करत आहेत. एकंदर फामासिस्ट हा पेंशट व डॉक्टर यांच्यातील दुवा आहे.
बाजारपेठेत एक लाखावर ब्रँडस आहेत ज्यात नावे सारखी, पण ओषधी द्रव्य मात्र वेगळे, गुणपण वेगळे त्यामुळे अत्यंत जबाबदारीने प्रिस्क्रिपनप्रमाणे औषध देणे गरजेचे असते या वस्तुस्थितीचा विचार केल्यावर फार्मासिस्टच्या भूमिकेची आवश्यकता आणि गरज अधिक लक्षात येईल.

*फार्मसीच्या शिक्षण शाखा*
फार्मसिमध्ये शिक्षण घ्यायचे असतील तर पुढील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत
डी फार्मसी ( पदविका )
बी फार्मसी ( पदवी )
एम फार्मसी ( पदव्युत्तर पदवी)
फार्मा डी

*फार्मसी नंतर करिअरच्या संधी*
फ्लो चार्ट

चौकट
*गुरुकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसिमध्ये प्रवेश का घ्यावा?* – या महाविद्यालयात डी फार्मसी, बी फार्मसी, एम फार्मसी हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे ज्यामध्ये प्रवेश घेतल्यानंतर फार्मसी करिअरच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध होतात. तसेच येथे विद्यार्थ्यांची कौशल्य वाढवीत म्हणून पारंपरिक अभ्यासक्रमा बाहेर जाऊन ‘हॅण्डस ऑन ट्रेनिंग’ दिले जाते गत वर्षी विद्यार्थांना हर्बल प्रॉडक्ट्स कसे बनवायचे याचे प्रशिक्षण दिले जाते. आता पर्यंत विद्यार्थ्यांनी च्यवनप्राश, त्रिफळा चूर्ण, त्रिफळा टॅबलेट, गुगुळ टॅबलेट, महानारायणी तेल, सुगंधी उठणे, नीम साबण, चंदन साबण, गुलाब साबण बनवले आहेत.
विद्यार्थींचे विक्री कौशल्य वाढावे म्हणून कमवा व शिका योजने अंतर्गत विद्यार्थिनी हर्बल प्रॉडक्स ची विक्री केली आहे. विद्यार्नसाठी जॉब प्लेसमेंटचे आयोजनही केले जाते. बरेच विद्यार्थ्यांची स्वतःचे मेडिकल स्टोअर्स आहेत त्याचबरोबर विद्यार्थी औषधी कंपनीच्या मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये, प्रोडक्शन, क्वालिट कंट्रोल डिपार्टमेंट, मेडिकल कोडिंग आणि फार्माकोविजिलन्स मध्ये नौकरी करत आहेत. येथे विशेष बाब निदर्शनास आणून द्यावी वाटते की या महाविद्यालयतील माजी विद्यार्थी *आकाश बडे* यांनी स्वतःची फार्मा कंपनी स्थापन केली आहे आणि त्याची वाटचाल यशस्वीरीत्या सुरू आहे.

लेखक
*प्रा. डॉ. निखिल निळकंठ जाधव*
(प्राध्यापक, गुरुकृपा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी)
मेंबर ऑफ वर्ल्ड ह्युमन राईट प्रोटेक्शन कमिशन

Back to top button