ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथे महिला कर्करोग मोबाईल व्हॅनचे उद्घाटन

ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथे महिला कर्करोग मोबाईल व्हॅनचे उद्घाटन
मंडणगड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय नामदार श्री योगेश दादा कदम यांच्या विशेष प्रयत्नाने पाठपुराव्याने ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथे महिला कर्करोग तपासणी अभियान अंतर्गत तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत तपासणी व जनजागृती मोहीम कर्करोग तपासणी मोबाईल व्हॅन द्वारे सदर व्हॅनचे उद्घाटन शिवसेना महिला समन्वयक सौ अस्मिता ताई केंद्रे व शहर प्रमुख गटनेता श्री विनोदजी जाधव यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
सदर कार्यक्रमास शिवसेना विभाग प्रमुख श्री ईरफान भाई बुरोंडकर सचिव श्री सिध्देश देशपांडे माजी सरपंच विश्वनाथजी सावंत वैद्यकिय अधिक्षक डॉ सगरे डॉ बावठणकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ गावंडे डॉ नागपुरे तसेच सर्व ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे व पणदेरी येथिल कर्मचारी वर्ग उपस्थित होते.



