जामखेड – सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू; ॲड.डाॅ. अरुण जाधव यांची पाहणी

जामखेड – सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू; ॲड.डाॅ. अरुण जाधव यांची पाहणी
जामखेड, २५ मे – तब्बल अडीच वर्षांपासून रखडलेल्या जामखेड-बीड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला असून आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. काम रखडल्यामुळे गेल्या काही वर्षांत अपघातांमध्ये अनेक निरपराधांना आपला जीव गमवावा लागला, तर महिलांसह लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक गंभीर जखमी झाले.
या महामार्गाचे काम पूर्ण व्हावे यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी सातत्याने आंदोलने केली, निवेदने दिली. स्थानिक पत्रकारांनीही या विषयाला वारंवार वाचा फोडत, प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधले. अखेर सर्वच स्तरांतील दबावाला झुकत संबंधित यंत्रणांनी काम सुरू केले आहे.
आज रस्त्याच्या पाहणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंत्यांसोबत चर्चा करून कामाचा आढावा घेतला.
या वेळी बाजार समितीचे माजी संचालक करण ढवळे, अभियंता कुणाल भारती, ठेकेदार सखाराम डोंगरे, गोकुळ हुलगुंडे,इलेक्ट्रॉनिक कंत्राटदार दत्ता वारे आदी मान्यवर उपस्थित होते.
जामखेड व परिसरातील नागरिकांनी या रस्त्याचे काम वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे



