रत्नागिरी

प्राथमिक आरोग्य केंद्र मंडणगड यांच्या ढिसाळ कारभार आर.पी.आय.मंडणगड यांच्यावतीने तिव्र आंदोलन करण्यातचा इशारा नगरसेवक आदेश मंर्चेडे

प्राथमिक आरोग्य केंद्र मंडणगड यांच्या ढिसाळ कारभार आर.पी.आय.मंडणगड यांच्यावतीने तिव्र आंदोलन करण्यातचा इशारा नगरसेवक आदेश मंर्चेडे

मंडणगड प्रतिनिधी

प्राथमिक आरोग्य केंद्र मंडणगड यांच्या ढिसाळ व्यवस्थापनास जबाबदार असणाऱ्यांवर योग्यती कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसीलदार मंडणगड यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मंडणगड यांनी दिला आहे .
वरील विषयांन्वये प्राथमिक आरोग्य केंद्र, मंडणगड येथे गेली अनेक महिन्यांपासून रूग्णांना योग्य त्या वैद्यकिय सुविधा मिळत नाहीत. तसेच १०८ व १०२ अॅम्बुलन्स यांची ही वेळेवर उपलब्धता होत नाही. डिझेल विना अॅम्बुलन्स सेवा व इतर सेवा ठप्प राहत असल्याने तालुक्यातील गोरगरिब रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत अनेक वेळा प्राथमिक आरोग्य केंद्र मंडणगड प्रशासनाला प्रत्यक्ष भेटून याबाबत विचारणाकरून देखील त्यात सुधारणा होत नाही. या आशा ढिसाळ व्यवस्थापनामुळे दिनांक १० मे २०२५ रोजी कुडुक बुद्रुक येथिल एक गरोदर मातेला आपल्या बाळासह प्राणाला मुकावे लागले आहे. या सर्व घटनेची चौकशी करून या घटनेस व ढिसाळ व्यवस्थापनास जवाबदार असणाऱ्यांवर योग्यती कांरवाई करण्यात यावी. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.), मंडणगड यांच्यावतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा नगरसेवक आदेशभाऊ मर्चडे यांनी दिला आहे.

Back to top button