रत्नागिरी

ज्ञानदीप विद्यामंदिर ची हर्षदा चंद्रशेखर मोडक बारावी परीक्षेत दापोली तालुक्यात प्रथम

ज्ञानदीप विद्यामंदिर ची हर्षदा चंद्रशेखर मोडक बारावी परीक्षेत दापोली तालुक्यात प्रथम

दापोली ०५:- ज्ञानदीप विद्यामंदिर दापोली संतोषभाई मेहता वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविदयालय दापोलीतील कु. हर्षदा चंद्रशेखर मोडक ९५.३३ टक्के गुण मिळवून दापोली तालुक्यात प्रथम आली आहे.
“ज्ञानदीप” दापोली ता. दापोली संचालित संतोषभाई मेहता वाणिज्य व विज्ञान क. महाविदयालयातील इ. १२ वी च्या वाणिज्य शाखेतील कु. हर्षदा चंद्रशेखर मोडक ९५.३३ टक्के गुण मिळवून महाविदयालयात व दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.असे ज्ञानदीप विद्यामंदिर दापोलीचे मुख्याध्यापक मोरे सर यांनी प्रसिद्धी पत्रकानुसार कळविले आहे.
यशस्वी विदयार्थीनीचे संस्थाध्यक्षा मा. श्रीम. सरोज मेहता मॅडम, चिटणीस श्री. सुजयशेठ मेहता, सहचिटणीस श्री. विश्वासकाका कदम, श्री. सुयोग मेहता, श्री. संकेत मेहता, मुख्याध्यापक श्री. मधुकर मोरे, विभाग प्रमुख श्री. मुस्तकिम रखांगे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Back to top button