📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

वारकरी संप्रदायात जाती भेद नाही म्हणून नारायणगड सर्वाचा मानला जातो- मठाधिपती महंत शिवाजी महाराज 

वारकरी संप्रदायात जाती भेद नाही म्हणून नारायणगड सर्वाचा मानला जातो- मठाधिपती महंत शिवाजी महाराज
मुलांसाठी संपती कमविण्यापेक्षा मुलांना संस्कारीत करा, शेती विका पण मुलांना शिकवा
नारायणगड च्या 73 व्या नारळी सप्ताहाची सांगता – मठाधिपती महंत शिवाजी महाराज
 मनोज जरांगे पाटील, आ. धस, डाॅ. ज्योतीताई मेटे यांची प्रमुख उपस्थिती
कोळगाव बाळासाहेब घाडगे – वारकरी संप्रदायाची परंपरा मोठी आहे त्यामध्ये जातीभेद नाही तुम्ही आम्ही एक आहोत म्हणून नारायणगड सर्वाचा मानला जातो.  एकमेकांविषयी एकमेकांच्या ह्रदयात प्रेमाचा पाझर फुटावा हाच खरा काला असल्याचे प्रतिपादन महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांनी केले. श्री क्षेत्र नारायण गडच्या ७३ व्या नारळी सप्ताहाची सांगता दि.१७ एप्रिल रोजी शिरूर कासार तालुक्यातील राक्षसभूवन येथे गुरुवारी काल्याच्या कीर्तनाने झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी उत्तराधिकारी संभाजी महाराज, भानुदास महाराज शास्त्री गोमळवाडा, मनोज जरांगे पाटील, आ. सुरेश धस, डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे, माजी आमदार बाळासाहेब आजबे, धनंजय देशमुख, मेहबूब शेख,विश्वस्त मंडळाचे सदस्य दिलीपराव गोरे, अँड महादेव तुपे, जे पी शेळके, बळीराम गवते, सी ए जाधव,गोवर्धन काशिद सर, राजेंद्र मस्के,सुर्योदय चे संपादक गंगाधर काळकुटे, कुंडलिक खांडे, युवा उद्योजक तथा नारायण गडाचे भक्त गणेश प्रकाशराव नलवडे, बळीराम चव्हाण बुरुसुळे नाना, नारायण बहिर, पत्रकार बाळासाहेब घाडगे, दिनेश गुळवे, राहुल लोंढे, अविनाश गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
   शिरूर कासार तालुक्यातील राक्षसनुभवन तांबे राक्षसभूवन येथील नारळी सप्ताहाची सांगता दि.१७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी नऊ वा. महंत शिवाजी महाराज यांची गावांमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पाथर्डी येथील संगित गायन पथकामधील कलाकारांनी भजन व भक्तीगीत गावून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ग्रंथपूजन करण्यात आले. दुपारी साडेबारा वा. महंत शिवाजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनास सुरुवात झाली. यावेळी महंत शिवाजी महाराज म्हणाले, की जीवनामध्ये अध्यात्म हाच खरा आनंद आहे आणि हा आनंद सप्ताहमधून मिळतो. समाजात व्यसनाधिनता, क्रोध वाढला आहे. समाजाला चांगल्या मार्गाला लावण्याचे काम साधू करतात, त्यामुळे साधुच्या आशीर्वादाची प्रत्येकाला गरज आहे. माणसाला माणूस साधू बनवतात, माणसातील दोष साधू दूर करतात असेही महंत शिवाजी महाराज म्हणाले. एकमेकांविषयी एकमेकांच्या ह्रदयात प्रेमाचा पाझर फुटावा हाच खरा काला असल्याचे प्रतिपादन महंत प्रेममूर्ती शिवाजी यांनी केले. देशभक्ती, व्यसनमुक्ती वृक्षारोपण करणे आवश्यक असून करून मुलांसाठी संपती कमविण्यापेक्षा मुलांना संस्कारीत करा, शेती विका पण मुलांना शिकवा, काहीही अडचणी आल्या तरी आत्महत्या करू नका असे आवाहनही महंत शिवाजी महाराज यांनी केले. आपण सर्व एकाच भगवंताचे स्वरुप आहोत, वारकरी संप्रदाय जातीभेद मानत नाही व यासाठी  नारायणगड सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन चालणारा असल्याचेही महंत शिवाजी महाराज म्हणाले. काल्याच्या कीर्तनानंतर उपस्थित लाखो भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी नारायणगड संस्थान फंडातील हभप रंगनाथ महाराज सुरळेगावकर, सिद्धेश्वर महाराज गाडे, गोरक्ष महाराज भिल्लारे ह भ प भागवत म गंगाधर,, लक्ष्मण महाराज तकिक, बाळू देवा मुळे आर्वीकर, विष्णु म औटे, श्रीकुमार महाराज ठोसर, महेश म शिंदे ,राहूल म ढेंगे, श्रीहरी म गवते, गोरक्षनाथ म भिलारे, सिध्देश्वर म बागलाने, रामनाथ म सालपे,आदी उपस्थित होते.
……. चौकट
बाबांचा शब्द पाळणार-आ. धस
आष्टी तालुका आणि नारायणगड चे जूने नातं आहे. वैकुंठवासी गुरुवर्य महंत महादेव महादेव याच तालुक्यातील आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त मोठ्या स्वरूपात कार्यक्रम आयोजन करण्यात येत असतात. चांगले नातं आहे. श्री क्षेत्र नारायण गड व महंत शिवाजी महाराज हे आपल्याला जो शब्द देतील तो शब्द आपण शतशः पाळणार असल्याचे प्रतिपादन आ. सुरेश धस यांनी केले. नारायणगडचा २०३६ चा नारळी सप्ताह आष्टी येथे होणार असून याचे नारळ आज आ. सुरेश धस यांना महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते देण्यात आले.
…….. चौकट
*आयोजकांचे मठाधिपती शिवाजी महाराज यांच्याकडून गौरव अन् कौतुक ..*
यावेळी राक्षसनुभवन तांबे, विघनवाडी, खोलेवाडी, पिंगळे वाडी ग्रामस्थांच्या वतीने ७३ वा नारळी सप्ताह नियोजनबद्ध केले होते. १०० ते १२५ एकरात नारळी सप्ताहाची नियोजन होते तर भव्य कार्यक्रम शांततेत पार पडले वाहतूक व्यवस्था पार्किंग व्यवस्था पाणी महाप्रसाद भोजन व्यवस्था अगदी सुरळीतपणे पार पडली.  या नियोजनाचे महंत मठाधिपती शिवाजी महाराज यांनी गौरव केला पणकौतुक केले . तसेच  लाखो भाविकांनी मोठे कौतुक केले..
७४ वा नारळी पुढील सप्ताह उमापूरात…
नारायणगडचा पुढील ७४ वा नारळी सप्ताह गेवराई तालुक्यातील उमापूर येथे होणार आहे. उमापूर येथील महिलांनी कलशधारी आणि पुरूषांनी वाजतगाजत मिरवणूक काढून उपस्थितांची मने जिंकली.
….क्षणचित्रे
◾ महंत शिवाजी महाराज यांची सकाळी नऊ वा राक्षसभूवन गावातून मिरवणूक
◾ मनोज जरांगे पाटील सकाळी दहा वाजता राक्षसभूवन येथे उपस्थित …
◾ महंत शिवाजी महाराज, आ. सुरेश धस, धनंजय देशमुख, राजेंद्र मस्के, मेहबूब शेख, सौरभ बजरंग सोनवणे एका मंचावर
◾ उमापूर ग्रामस्थांनी सवाद्य मिरवणूक काढून घेतले नारळ
◾ तीन वाजता लाखो भाविकांना काला महाप्रसाद वाटप
 सप्ताहात संत-महंतांची उपस्थिती
  ◾ मनोज जरांगे पाटील, आ. सुरेश धस यांनी ऐकले पूर्ण कीर्तन
◾आ. सुरेश धस यांनी आष्टी येथे २०३६ मधील तर आर्वी ग्रामस्थांनी २०३७ मधील घेतले नारळ
Back to top button