बीड

चिंच झोडपणी हंगाम सुरू ; चिंच फोडुन बेरोजगारीवर मात ; दुष्काळी परिस्थिती महिलांना रोजगार ; लिंबागणेश परीसरातील चित्र :- डॉ.गणेश ढवळे

चिंच झोडपणी हंगाम सुरू ; चिंच फोडुन बेरोजगारीवर मात ; दुष्काळी परिस्थिती महिलांना रोजगार ; लिंबागणेश परीसरातील चित्र :- डॉ.गणेश ढवळे
—-
लिंबागणेश:- ( दि.२२ )बीड तालुक्यातील लिंबागणेश परीसरात चिंच झोडणीचे काम जोरदार सुरू असुन चिंच फोडणीच्या कामामुळे ग्रामीण भागातील महिला मजुरांच्या हाताला काम मिळत आहे.चिंच फोडणीसाठी १२ रूपये किलो दर मिळत असुन एक महिला दिवसातुन २५ ते ३० किलो चिंच फोडणी करत असल्याने ३५० रुपयांपर्यंत रोजंदारी पडत असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. शेतमजुर, महिला वर्ग आर्थिक संकटात असताना अशावेळी चिंच फोडणी कामाने महिलांच्या हाताला काम मिळाल्याने बेरोजगारीचा प्रश्न काही प्रमाणात मिटला आहे.
चिंचा झोडण्याचे काम जिकिरीचे  ; पुर्ण कुटुंबिला रोजगार :- अजय थोरात
चिंचा झोडण्याचे काम फेब्रुवारी मध्ये सुरू होऊन मे महिन्यांपर्यंत संपते. या ४ महिन्यात ग्रामीण भागात यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते.झाडावर चढुन बांबुने झोडपुन चिंचा खाली पाडणे, पडलेल्या चिंचा वेचणे, त्यांच्यावरील टरफल बाजुला करणे,चिंचा फोडुन गर व चिंचोके वेगळे करणे आदी कामे कुटुंबातील महिला व मुले करतात. झाडांच्या फांदीवरून धोकादायक पद्धतीने झोडपणी करावी लागते.गेल्या १५ वर्षांपासून आम्ही भावंडे चिंचा झोडण्याचा व्यवसाय करत असल्याचे लिंबागणेश येथील अजय परमेश्वर थोरात यांनी सांगितले.
यावर्षी बाजारभाव चांगले; परंतु आवक कमी :- चंद्रकांत आवसरे
गेल्या वर्षीच्या मानाने यावर्षी चिंचाला बाजारभाव चांगला मिळत असुन नगर येथील व्यापारी जागेवर येऊन माल घेऊन जातात.फोडलेल्या चिंचेला प्रतिकिलो ११ रूपये बाजारभाव मिळतोय. यावर्षी चिंचेच्या झाडांना चिंचेचे प्रमाण कमी असल्याने यावर्षी आवक कमी प्रमाणात असल्याचे लिंबागणेश येथील चिंचेचे व्यापारी चंद्रकांत आवसरे यांनी सांगितले.
Back to top button