बीड
भावनीक फेसबुकवर पोस्ट करत आश्रम शाळेवरील शिक्षकाने गळफास घेऊन संपवले जीवन…!

भावनीक फेसबुकवर पोस्ट करत आश्रम शाळेवरील शिक्षकाने गळफास घेऊन संपवले जीवन…!
इन कॅमेरा पंचनामा करण्याची कुटुंबाची मागणी त्याला मारून टाकले व लटकवल्याचा कुटुंबाने आरोप…
बीड प्रतिनिधी – बीडच्या केस तालुक्यातील केळगाव येथील आश्रम शाळेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या
धनंजय अभिमान नागरगोजे वय वर्ष 30 राहणार देवगाव ता. केज जिल्हा बीड मयत
हा मयत हा केळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक आहे. 2019 मध्ये राज्य सरकारने 20 टक्के अनुदान घोषित करण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही. गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक म्हणून काम करत असताना अनेक अडचणी आल्या आज रोजी या शिक्षकाने बीड येथे कृष्णा अर्बन बँकेच्या इमारतीत गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. इन कॅमेरा पंचनामा करण्याची कुटुंबाची मागणी त्याला मारून टाकले व लटकवल्याचा कुटुंबाने दावा केला आहे.
फेसबुक वर भावनिक पोस्ट करत आश्रम शाळेतील शिक्षकांना आपलं जीवन संपवला आहे संस्था चालक ही राक्षसी वृत्तीचे आहेत यामध्ये संस्थाचालक विक्रम बाबुराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे, ज्ञानेश्वर राजाभाऊ मुरकुटे, गोविंद नवनाथ आव्हाड हे सर्वजण माझ्या आत्महत्येस कारणीभूत आहेत. यांनी फार मला त्रास दिला आहे. त्यामुळे मी जीवन संपत आहे अशी फेसबुक वर पोस्ट करत शिक्षकान जीवन संपवला आहे.



