बीड

सोयाबीन खरेदीला महिनाभर मुदतवाढ द्यावी ; ५० टक्केच खरेदी झाली असुन ३२ हजार शेतकरी वंचित राहण्याचा धोका  :- डॉ.गणेश ढवळे

सोयाबीन खरेदीला महिनाभर मुदतवाढ द्यावी ; ५० टक्केच खरेदी झाली असुन ३२ हजार शेतकरी वंचित राहण्याचा धोका  :- डॉ.गणेश ढवळे

बीड:- ( दि.३१ ) बीड जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या  एकुण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी केवळ ५० टक्के शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीची प्रक्रिया पुर्ण झाली असुन उर्वरित शेतकऱ्यांच्या ५० टक्के शेतकऱ्यांचे ३१ जानेवारी पर्यंत इतक्या कमी कालावधीत खरेदी प्रक्रिया पुर्ण होणे शक्यच नाही. त्यामुळे सोयाबीन खरेदीला आणखी महिनाभर मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

सविस्तर माहितीस्तव

बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी ४४ हजार ७७४ शेतकऱ्यांनी नाफेड कडे सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यानंतर १५ ऑक्टोबर २०२४ पासून नाफेड च्या वतीने बीड जिल्ह्यातील ३० केंद्राद्वारे सोयाबीन खरेदी सुरुवात झाली होती . आज ३१ जानेवारी २०२५ शेवटची तारीख असताना आतापर्यंत केवळ १२  हजार ५००शेतकऱ्यांची ३ लाख ४१ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असून गुरुवारी ३० जानेवारी पर्यंत मुदतवाढ मिळाली नसल्याने जर आज मुदत वाढ मिळाली नाही तर बीड जिल्ह्यातील ३२ हजार शेतकऱ्यांना खुल्या बाजारात बेभाव सोयाबीन घालावी लागणार आहे .बीड जिल्ह्यातील यंदा ३ लाख  ८७ हजार ९३९ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झालेला आहे .सरासरी हा पेरा २ लाख २६ हजार २३४ हेक्टर असतो. यंदा मात्र सरासरीच्या तुलनेत १७१ टक्के झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पन्न वाढले असल्याने तब्बल ४४ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून शासनाने केवळ १२ हजार ५०० शेतकऱ्यांचीच सोयाबीन खरेदी केली आहे. त्यामुळे आज मुदत वाढ मिळणे गरजेचे आहे.
शासनाच्या वतीने सोयाबीन खरेदी केली जात आहे शासन प्रति क्विंटल ४८९२ रुपये भाव देत आहे .खुल्या बाजारात व्यापारी मात्र ४००० ते ४४०० प्रति क्विंटल सोयाबीन खरेदी करत असल्याने क्विंटल मागे शेतकऱ्यांना ८०० ते ५०० रुपये तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणैश ढवळे यांनी केली आहे.

Back to top button