बीड
बीड मुख्य टपाल कार्यालयात रेल्वे तिकीट बुकिंग (PRS) काऊंटर सुरू करा आणि बीड ते पुणे एक्सप्रेस रेल्वे सेवेला ‘चंपावती एक्सप्रेस’ नाव द्या- प्रा. सनी विष्णू वाघमारे

बीड मुख्य टपाल कार्यालयात रेल्वे तिकीट बुकिंग (PRS) काऊंटर सुरू करा आणि बीड ते पुणे एक्सप्रेस रेल्वे सेवेला ‘चंपावती एक्सप्रेस’ नाव द्या- प्रा. सनी विष्णू वाघमारे
*जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन*
बीड ते अहिल्यानगर/पुणे रेल्वे सेवा यशस्वी [email protected] रित्या सुरू झाल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार या ऐतिहासिक रेल्वे क्रांतीच्या अनुषंगाने बीडकरांच्या वतीने दोन महत्वाच्या मागण्या जिल्हाधिकारी महोदयांकडे निवेदनाद्वारे मांडल्या आहेत.
*मागणी क्र. १ : मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे PRS काउंटर सुरू करावा*
सध्या बीड रेल्वे स्टेशन शहरापासून दूर असल्याने जेष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांना तिकीट आरक्षणासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे आणि टपाल विभागाच्या देशव्यापी सामंजस्य करारानुसार (MoU), मध्यवर्ती भागात असलेल्या बीड मुख्य टपाल कार्यालयात (Head Post Office) ‘पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम’ (PRS) काउंटर तात्काळ सुरू करण्यात यावे, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय व आर्थिक फसवणूक थांबेल.
*मागणी क्र. २ : बीड ते पुणे एक्सप्रेस रेल्वे सेवेला ‘चंपावती एक्सप्रेस’ नाव द्यावे*
बीड शहराला प्राचीन काळी ‘चंपावतीनगरी’ म्हणून ओळखले जात होते आणि येथील ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिरही राणी चंपावती यांनी बांधले आहे. जिल्ह्याचा हा गौरवशाली इतिहास आणि सांस्कृतिक अस्मिता जपण्यासाठी या रेल्वे सेवेला ‘चंपावती रेल्वे’ नाव देण्यात यावे.
तरी, आपण या लोकहितार्थ मागण्यांचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकार, रेल्वे प्रशासन आणि टपाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तात्काळ समन्वय साधून सकारात्मक निर्णय मिळवून द्यावा, ही नम्र विनंती.
माननीय संपादक साहेब वरील बातमी आपल्या दैनिकात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती
*आपला,*
*प्रा. सनी विष्णू वाघमारे*



