📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

ना. पंकजाताई मुंडेंच्या उपस्थितीत घाटकोपरमध्ये विकसित भारत संकल्प सभा ; सेवा ज्योती यात्रेचाही केला शुभारंभ

ना. पंकजाताई मुंडेंच्या उपस्थितीत घाटकोपरमध्ये विकसित भारत संकल्प सभा ; सेवा ज्योती यात्रेचाही केला शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे विकसित भारताचे स्वप्न  खऱ्या अर्थाने पूर्णत्वाकडे

मुंबई दि. ०७ —
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा पाया रचला, त्यांच्यामुळेच विकसित भारताचे स्वप्न  खऱ्या  अर्थाने पूर्णत्वाकडे जात असल्याचे सांगत मोदींचा चेहरा आज भाजपाचा ब्रॅन्ड बनला आहे असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनसेवा ते राष्ट्रसेवा या यशस्वी राजकीय कारकिर्दीला पंचेवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुंबई उपनगरातील घाटकोपर (पूर्व) येथे झवेरबेन पोपटलाल सभागृहात भाजपच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित विकसित भारत संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे  विचार त्यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत यावेळी व्हर्च्युअल माध्यमातून ऐकले. संपूर्ण देशभरात एकाचवेळी हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हर्च्युअल संबोधन होण्यापूर्वी ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने विकसित भारत संकल्प सभेची सुरवात झाली.भाजपचे प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा,  जिल्हाध्यक्ष दिपक दळवी, लालबहादूर यादव, संयोजक हेमंत भास्कर, नगरसेविका राखी जाधव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष योगेश मकवाना, महिला मोर्चा अध्यक्षा दीपिका घाग, प्रभाग समिती अध्यक्ष साक्षी दळवी, आश्विनी मते आदी यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना पंकजाताई म्हणाल्या,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सुरवात केली आणि एकदा नाही तर तीन वेळेस ते पंतप्रधानपदावर विराजमान  झाले, त्यांना खरचं दैवी आशीर्वाद असावा असे वाटते. आयुष्यचा क्षण न क्षण त्यांनी जनसेवा आणि राष्ट्रसेवेसाठी खर्च केला.त्यांच्यामुळे देशाचा नावलौकिक जगात झाला, यांनी आत्मनिर्भर भारताचा पाया रचला, विकसित भारताचे स्वप्न खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळेच पूर्णत्वास येत आहे. भारत आज जागतिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. पक्षाचे संघटन आणि मिळालेले संस्कार भविष्यात आपल्या सर्वांना अधिक उंचीवर घेऊन जातील असं त्या म्हणाल्या.

सेवा ज्योती यात्रेचा केला शुभारंभ
———-
यानिमित्त काढण्यात आलेल्या सेवा ज्योती यात्रेचा शुभारंभ ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आल्या. आ. मिहीर कोटेचा, दिपक दळवी यांचे सह त्या स्वतः ज्योत घेऊन यात्रेत सहभागी झाल्या. आत्मनिर्भर भारताची भली मोठी रांगोळी यावेळी रेखाटण्यात आली, त्याचेही कौतुक त्यांनी केले. कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोक प्रतिनिधी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
••••

Back to top button