बीडमध्ये 29 सप्टेंबरला पत्रकार व डिजिटल मीडिया क्षेत्रातील मान्यवरांची विशेष संवाद बैठक

बीडमध्ये 29 सप्टेंबरला पत्रकार व डिजिटल मीडिया क्षेत्रातील मान्यवरांची विशेष संवाद बैठक
पत्रकारांच्या समस्या, हक्क, डिजिटल माध्यमांचे भविष्य आणि बदलत्या तंत्रज्ञानावर होणार विचारमंथन..!
सर्व पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे वैभव स्वामी यांचे आवाहन
बीड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया (मुंबई) यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील पत्रकार, डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत पत्रकार, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी तसेच डिजिटल मीडिया क्षेत्रातील तज्ज्ञांची विशेष संवाद बैठक मंगळवार, दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत हॉटेल अन्विता, जालना रोड, बीड येथे आयोजित करण्यात आली आहे. या संवाद बैठकीला आणि बैठकीनंतर नूतन जिल्हा कार्यकारणी निवड बैठकीस बीड जिल्ह्यातील सर्व डिजिटल मीडिया पत्रकार तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश संघटक संजय भोकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तर प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे आणि महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया मुंबईचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, प्रदेश उपाध्यक्ष समीर देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये डिजिटल मीडियाची बांधणी आणि विविध प्रश्नांवर वैचारिक मंथन केले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर बीड येथे मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी हॉटेल अन्विता, जालना रोड, बीड या ठिकाणी दुपारी 12 ते 2 दरम्यान वैचारिक संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीनंतर नूतन बीड जिल्हा डिजिटल मीडियाची कार्यकारनी सर्वांनुमते जाहीर करण्यात येणार आहे.
आजच्या बदलत्या काळात पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत असून डिजिटल माध्यमांसमोर अनेक नवीन आव्हाने उभी राहत आहेत. पत्रकारांच्या विविध समस्या, पत्रकारांचे हक्क, डिजिटल माध्यमांचे भविष्य, बदलते तंत्रज्ञान, सोशल मीडिया पत्रकारिता, वृत्तांची विश्वासार्हता आणि पत्रकारांच्या संघटनात्मक प्रश्नांवर प्रत्यक्ष संवाद साधून विचारविनिमय करण्याच्या उद्देशाने या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीस महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया (मुंबई)चे प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रमुख मा. समीर देसाई, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेश संपर्कप्रमुख तथा दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव जगदेवी विवेक स्वामी हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाचे पुणे जिल्हा सचिव मा. सागर माने, महिला उपाध्यक्ष मा. अश्विनी वायसे आणि स्वीय सहाय्यक मा. स्नेहा शेडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
ही बैठक केवळ औपचारिक बैठक नसून बीड जिल्ह्यातील पत्रकारांचा आवाज एकत्र आणण्यासाठी, पत्रकारांच्या अडचणी व प्रश्नांना संघटनात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि डिजिटल पत्रकारितेच्या भविष्यासंदर्भात सामूहिक दिशा निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पत्रकार बांधव-भगिनींना आपले अनुभव, सूचना, प्रश्न आणि विचार मांडण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.
या संवाद बैठकीस बीड जिल्ह्यातील प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील सर्व पत्रकार बांधव-भगिनींसह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी निर्धारित वेळेत आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया (मुंबई)च्या वतीने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी केले आहे.


