📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

सफेपुरमध्ये युवकांच्या नेतृत्वात अण्णाभाऊ साठेंची विचारांची जयंती उत्साहात साजरी..

सफेपुरमध्ये युवकांच्या नेतृत्वात अण्णाभाऊ साठेंची विचारांची जयंती उत्साहात साजरी..

बीड | प्रतिनिधी
सफेपुर येथे रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती युवकांच्या नेतृत्वाखाली उत्साहात आणि वैचारिक वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास गावचे सरपंच माधवराव आहेर, उपसरपंच विष्णू अण्णा मेंगडे, माजी सरपंच श्रीराम अप्पा घोडके, सामाजिक कार्यकर्ते सतीशजी पायाळ, आर्थिक सल्लागार नामदेव घोडके सर, बालासाहेब घोडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर लहुजी साळवे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा शाल, हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव घोडके सर यांनी केले. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. सामाजिक कार्यकर्ते सतीशजी पायाळ यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत युवकांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवावे, असे आवाहन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘साठेनगर’ फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात महामानवांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत युवकांसह लहान मुले, महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाचे नियोजन उमेश थोरात, अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे, उपाध्यक्ष तसेच गावातील अनेक युवकांनी एकत्रितपणे केले. सामाजिक व शैक्षणिक नवचैतन्य निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे बालाघाट परिसरातून कौतुक होत आहे.

Back to top button