📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

वॉर्ड क्रमांक 25 मध्ये ‘एसआयआर मॅपिंग’ नोंदणी आणि पडताळणी शिबिराचे विशेष आयोजन

वॉर्ड क्रमांक 25 मध्ये ‘एसआयआर मॅपिंग’ नोंदणी आणि पडताळणी शिबिराचे विशेष आयोजन

नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह या शिबिराला उपस्थित राहून आपली नोंदणी पूर्ण करावी – अ‍ॅड.गोविंद शिराळे पाटील

बीड (प्रतिनिधी):- लोकशाही बळकट करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाचे नाव मतदार यादीत अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन बीड शहरातील वॉर्ड क्रमांक 25 मध्ये ‘एसआयआर मॅपिंग’ नोंदणी आणि पडताळणी शिबिराचे विशेष आयोजन युवा नेते नगरसेवक अ‍ॅड. गोविंदा भैया शिराळे पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय, ओम नमो सदन, जिजाऊ नगर, रेणू हॉस्पिटल समोर, बार्शी रोड बीड या ठिकाणी  बीड येथे शनिवार दि. 11 व रविवार 12 जुलै ठिक सकाळी 11.30 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. वॉर्डातील सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह या शिबिराला उपस्थित राहून आपली नोंदणी पूर्ण करावी, असे जाहीर आवाहन भाजपा नगरसेवक  नगरसेवक अ‍ॅड. गोविंदा भैया शिराळे पाटील यांनी केले आहे.ङ्गया विषयी सविस्तर माहिती अशी की, बीड शहरातील वॉर्ड क्रमांक 25 मध्ये ’एसआयआर मॅपिंग’ नोंदणी आणि पडताळणी शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. वॉर्डातील सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह या शिबिराला उपस्थित राहून आपली नोंदणी पूर्ण करावी, नागरिकांच्या सुविधेसाठी आणि ही प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी शिबिरस्थळी अधिकृत बीएलओ (एसआयआर) अधिकारी आणि बूथस्तरीय कार्यकर्ते पूर्ण वेळ उपलब्ध राहणार आहेत. नागरिकांनी आपल्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे (उदा. आधार कार्ड, जुने ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा) सोबत आणावीत, जेणेकरून जागेवरच पडताळणी व नोंदणीची प्रक्रिया विनाअडचण पूर्ण करता येईल. वॉर्डातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभघ्यावा आणि राष्ट्रीय कर्तव्यात आपले योगदान द्यावे, आवाहन भाजपा नगरसेवक  नगरसेवक अ‍ॅड. गोविंदा भैया शिराळे पाटील यांनी केले आहे.

Back to top button