📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जामखेड महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

जामखेड महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

जामखेड प्रतिनिधी – दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे जामखेड महाविद्यालय जामखेड व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. पुराणे एस. जी होते. कला शाखाप्रमुख, प्रा. फलके ए. बी, ग्रंथपाल प्रा. डॉ . माने एस. डी , रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. सरवदे वाय. डी, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ . मस्के जी.आर, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. महारनवर डी. एस, प्रा. मस्के जी.आर, डॉ. सरवदे वाय. डी यांनी वाचन प्रेरणा दिना निमित्त मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ.पुराणे यांनी वाचन केल्यावर व्यक्तीचा विकास हा बहुआयामी होते. वाचनाने मानसिक, सामाजिक, आर्थिक स्वास्थ लाभते. यासाठी विद्यार्थांनी रोज वाचन करावे याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.फलके ए. बी, यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. भाकरे आर, ए. यांनी केले. आभार प्रा. मोहळकर एस. डी यांनी मानले‌.
कार्यक्रमासाठी सहकार्य प्रा. तरटे एन. बी, प्रा.पवार जी. बी, श्री. होशिंग एस, आर , श्री. सदाफुले आर. ए, श्री देशमुख ए. डी. यांचे लाभले.

Back to top button