बीड

अंबाजोगाईचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार! २०६ कोटींच्या नवीन नळयोजनेतील महत्त्वाच्या टप्प्यातील पाईपलाईन चाचणी यशस्वी

अंबाजोगाईचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार! २०६ कोटींच्या नवीन नळयोजनेतील महत्त्वाच्या टप्प्यातील पाईपलाईन चाचणी यशस्वी
अंबाजोगाई प्रतिनीधी बालाजी देशमुख;अंबाजोगाईकरांची पाण्याची चिंता लवकरच कायमची मिळण्याची चिन्हे आहे. शहरासाठी मंजूर झालेल्या २०६ कोटी रुपयांच्या नवीन महत्त्वाकांक्षी नळयोजनेअंतर्गत धनेगाव मांजरा प्रकल्प ते औरंगपूर या टप्प्यातील नवीन पाईपलाईनची टेस्टिंग आज यशस्वीपणे पार पडली. आ. नमिता मुंदडा यांच्या विशेष प्रयत्नातून ही योजना प्रत्यक्षात येत असून, या महत्त्वपूर्ण चाचणीमुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या अनेक काळापासून अंबाजोगाई शहरातील नागरिक पाणीटंचाईच्या झळा सोसत होते. पाण्यासाठी नागरिकांना वारंवार सहन करावा लागणारा त्रास लक्षात घेता या योजनेची अत्यंत आवश्यकता होती. आज घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाल्याने या योजनेतील एक मोठा आणि महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. उर्वरित प्रशासकीय व तांत्रिक बाबींची पूर्तता करून ही नळयोजना लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली जाणार आहे. योजना पूर्णपणे सुरू झाल्यानंतर अंबाजोगाई शहराचा पाणीप्रश्न कायमचा निकाली निघेल आणि नागरिकांच्या हक्काचे पाणी त्यांच्या दारात पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Back to top button