बीड

माळापुरी येथे कृषीदुतांकडून माती परीक्षण उपक्रम

माळापुरी येथे कृषीदुतांकडून माती परीक्षण उपक्रम

के.एस.के. कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांनी माळापुरी येथे माती परीक्षण उपक्रम राबवून शेतकऱ्यांमध्ये वैज्ञानिक शेतीबाबत जनजागृती केली . शेतकऱ्यांच्या जमिनीची शास्त्रीय माहिती मिळावी योग्य खत व्यवस्थापन करता यावे आणि उत्पादन क्षमता वाढावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

या उपक्रमांतर्गत कृषीदुतांनी गावातील विविध शेतीमध्ये जाऊन मातीचे नमुने संकलित केले
संकलित नमुनाद्वारे जमिनीतील पोषणतत्वांची कमतरता‌ पीएच मूल्य, सेंद्रिय कर्ब, वीज वहन क्षमता आधी घटकांची तपासणी करण्यात येणार असून त्यानुसार शेतकऱ्यांना पिकनिहाय शिफारसी दिल्या जाणार आहेत.
यावेळी महाविद्यालयाचे सहसचिव डॉ. जी.व्ही. साळुंखे, प्रा.एस .पी .मोरे., समन्वयक प्रा. डी. बी. राठोड, कार्यक्रम अधिकारी डॉ.एस .जी .माने सर यांचे मार्गदर्शन लाभले .
या उपक्रमाचे माळापुरीचे उपसरपंच समीर भाई बेग यांनी या उपक्रमाचे कौतुक करत कृषीदुतांच्या कार्याचे अभिनंदन केले.
उपक्रमात कृषिदूत विजय शिंदे, प्रतीक शीरामे, सुमेध वाघमारे, रोहन वखरे, राहुल उबाळे, दत्ता वैद्य, पवन थोरात, अनंता थोरात, आदित्य तळेकर, अमंतराजे शेळके आदींनी माती संकलनात सहभाग घेतला यावेळी मार्गदर्शकयशवंत पडुळे, शाहरुख शेख, उमर अहमद, कदीर बेग, जयंत डोळस, तोफिक बेग, पाशा इनामदार, वसंत डोळस, येशुनाथ पडुळे, पाशा बेग आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Back to top button