बीड

महाराष्ट्र दिन : तपनेश्वर शाळेत पालकांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र दिन : तपनेश्वर शाळेत पालकांच्या हस्ते ध्वजारोहण

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळा सक्षम – केंद्रप्रमुख राम निकम

जामखेड | प्रतिनिधी

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त शहरातील तपनेश्वर परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पालक योगिता संतोष नवलाखा व हिना दाऊद बागवान यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष धनराज पवार, मुख्याध्यापक मच्छिंद्र खैरे,उपाध्यापक प्रताप पवार, उपाध्यापिका जयश्री पाटील, मंगल सोलंकर, शितल कदम, रूपाली कांबळे, कल्पना मोरे, स्वाती गोरे यांच्यासह पालक दत्तात्रय जगताप, राजेंद्र लुकंड, युसुफ शेख, तय्यब बागवान,जाबीर तांबोळी, मोहसीन शेख,अशपाक बागवान आदी विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी पालकांना त्यांच्या पाल्यांच्या प्रश्नपत्रिका तसेच गुणपत्रकांचे वाटप करण्यात आले. पाल्याच्या गुणवत्तेचा आलेख पारखण्यासाठी पालकांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या पाल्याची गुणवत्ता तपासली.

कार्यक्रमानंतर केंद्रप्रमुख राम निकम यांनी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये वाचन-लेखनाच्या मुलभूत प्रक्रिया रुजल्या पाहिजेत तसेच शिक्षणाबद्दल आवड निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा सक्षम असून येथील शिक्षक प्रयत्नशील आहेत. शासनाच्या विविध सुविधा जिल्हा परिषद शाळांमध्ये उपलब्ध असून पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश अशा शाळांमध्ये घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.आपल्या हक्काची शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा असून त्या टिकवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.

यावेळी बोलताना मुख्याध्यापक मच्छिंद्र खैरे बोलताना म्हणाले,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. वाचन-लेखनाच्या भक्कम पायावर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. शासनाच्या सुविधा व शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये उत्तम शिक्षण मिळते. पालकांनीही शाळेशी संपर्क ठेवून आपल्या पाल्यांच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यावा.

Back to top button