बीड

आंबेडकर विचारांनीच घडेल तरुणांचे भविष्य : आकाश बाफना

आंबेडकर विचारांनीच घडेल तरुणांचे भविष्य : आकाश बाफना

जामखेड प्रतिनिधी:

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे डॉ. आंबेडकरांचे तत्त्वज्ञान आजही तितकेच जिवंत आणि प्रेरणादायी आहे. शिक्षण हेच खरे शस्त्र असल्याची जाणीव करून देत त्यांनी समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे महान कार्य केले, असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते आकाश बाफना यांनी केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जामखेड शहरात विविध ठिकाणी जाऊन आंबेडकर ब्लॉक येथे अभिवादन केले .

यावेळी शिवसेना युवा नेते आकाश शेठ बाफना यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी आंबेडकरी चळवळीचे नेते विकीभाऊ सदाफुले,सोनू सदाफुले,काळू जाधव, किशोर कांबळे,दिपक सदाफुले,सुनील जावळे, अभिमान गायकवाड, सुहास आव्हाड, गणेश लुंकड तसेच इतर भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना बाफना यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आजच्या तरुण पिढीने आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले भविष्य घडवावे, असे त्यांनी आवाहन केले.

Back to top button