बीड

अंमळनेर गावचे भूषण शामराव अण्णा ( नाना )पोकळे यांचे अल्पशा आजारांने निधन.

अंमळनेर गावचे भूषण शामराव अण्णा ( नाना )पोकळे यांचे अल्पशा आजारांने निधन.

अंमळनेर प्रतिनिधी दि. १२ पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील रहिवासी असलेले ज्येष्ठ नागरिक शामराव अण्णा पोकळे (नाना ) यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दि. १०/०४/२०२६ रोजी अहिल्यानगर येथील हॉस्पिटलमध्ये तोंड येण्यावरील उपचार घेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मावळली. नानाच्या निधनाने अंमळनेर व पिंपळवंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे . ते धार्मिक वृत्तीचे व्यक्तिमत्व होते . अध्यात्मिक, राजकीय,शैक्षणिक, सहकार क्षेत्रात सहभाग असायचा . संपूर्ण परिसर त्यांना नाना नावाने हाक मारायचा . प्रत्येक माणसाच्या सुख-दुःखात सहभागी राहून स्वतःच्या जिद्द आणि चिकाटीच्या जीवावर एक आगळी वेगळी छाप त्यांची असायची . त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या शेतामध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी ह भ प बजुगडे महाराज , जिल्हा परिषद सदस्य माऊली आप्पा जरांगे , सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अण्णा भवर, परिसरातील आजी-माजी सरपंच , उपसरपंच, सर्व क्षेत्रातील नागरिक अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, व्यापारी , पत्रकार, वारकरी संप्रदाय , नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते, नानाच्या आत्म्यास शांती लाभो नानांना सर्वांनी मिळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं व सुना , भाऊ, पुतणे , नातवंड असा परिवार आहे . पोकळे परिवाराच्या दुःखात दैनिक सूर्योदय परिवार सहभागी आहे .

Back to top button