मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडे यांच्या मातोश्रींचे निधन; डॉ.संतोष मुंडे यांच्याकडून मुंडे कुटुंबियांचे सांत्वन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) -.
आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या मातोश्री श्रीमती अश्रुबाई हरिभाऊ मुंडे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.यांच्या दुःखद निधनाबद्दल दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अभियान उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या ताडसोन्ना येथील निवासस्थानी जावुन मुंडे कुटुंबियांची भेट घेवुन सांत्वन केले. तसेच कै. श्रीमती अश्रुबाई हरिभाऊ मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघातील मौजे ताडसोन्ना येथे दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अभियान उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी जाऊन शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव श्री. तुकाराम मुंडे व माजी अप्पर जिल्हाधिकारी श्री. अशोक मुंडे यांचे सांत्वनपर भेट घेतली.
स्व. अश्रुबाई हरिभाऊ मुंडे ह्या एक मनमिळावू स्वभावामुळे सर्वपरिचित होत्या. अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने आपल्या मुलांना घडवले. मातोश्री स्व.अश्रुबाई हरिभाऊ मुंडे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी डॉ.संतोष मुंडे यांच्यासह जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, रघुनाथ तोंडे अशोक सोनवणे तसेच मुंडे कुटुंबिय उपस्थित होते.



