बीड

ईट येथे गुगळादेवी यात्रा निमित्त शांतीब्रम्ह नवनाथ बाबा यांची भव्य दिव्य मिरवणूक 

ईट येथे गुगळादेवी यात्रा निमित्त शांतीब्रम्ह नवनाथ बाबा यांची भव्य दिव्य मिरवणूक
पारंपरिक वाद्य, हरी नाम घोषाने  गावकरी मंत्रमुग्ध
बीड (प्रतिनिधी) दर वर्षी प्रमाणे गुगळादेवी मातेची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असते गेली 10 ते 11 वर्षापासून गुगळादेवी यात्रा निमित्त व भिक्षा कार्यक्रम निम्मित गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज मठाधिपती महंत श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी यांची ईट ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत मिरवणूक काढण्यात येते या हि वर्षी उत्साहात गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली
        ढोल ताशा लेझीम वाजवत गावातील तरुण मंडळी, महिला मंडळी, लहान थोर भाविक भक्तांच्या उपस्थिती मध्ये ईट फाटा ते ईट गाव या मार्गामध्ये सडा रांगोळी काढून हरी नामाच्या जय घोषात करत गावकऱ्यांच्या वतीने गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली
         गुगळादेवी यात्रा निमित्त ईट गावातील हनुमान मंदिरात परिसरात मिरवणुकीचा समारोप करण्यात या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
Back to top button