📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

तपनेश्वर हनुमान मंदिरात रामनवमी ते हनुमान जयंती उत्सवानिमित्त;विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

तपनेश्वर हनुमान मंदिरात रामनवमी ते हनुमान जयंती उत्सवानिमित्त;विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

*सर्व कार्यक्रमाचा भाविकभक्तांनी लाभ घ्यावा ~ प्रविण होळकर यांचे आवाहन.*

जामखेड : तपनेश्वर येथील हनुमान मंदिरात श्री रामनवमी ते हनुमान जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार (ता. २६) मार्च ते गुरुवार (ता. २) एप्रिल २०२६ या कालावधीत हा उत्सव पार पडणार असून,उत्सवाच्या कालावधीत दासबोध पारायण, रामजप, गाथा भजन, महिला भजन तसेच दररोज रात्री किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात गुरुवारी (ता. २६) सकाळी ७:३० कलश पुजन व विनापुजनाने होणार असून, व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प. संतोष बाळासाहेब राळेभात (पाटील) कार्यभार सांभाळणार आहेत.
दरम्यान, ह.भ.प. कैलास महाराज भोरे, यांचे सकाळी १० ते १२ यावेळेत श्रीराम नवमीनिमित्त हरीकिर्तन होणार असुन ह.भ.प.विवेकानंद महाराज मंजरतकर,ह.भ.प.रामचंद्र महाराज शिंदे,ह.भ.प.विजय महाराज बागडे, ह.भ.प.राजाभाऊ महाराज म्हेत्रे,हे.भ.प. लखन महाराज चव्हाण,हे.भ.प. गणेश महाराज नवले,ह.भ.प.ओंकार महाराज नन्नवरे या सर्व मान्यवरांची किर्तनसेवा दररोज रात्री ७ ते ९ या वेळेत होणार आहेत त्याचबरोबर प्रत्येक दिवशी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.दैनिक कार्यक्रमामध्ये पहाटे ५ ते ६ काकडा ह.भ.प. संतोष महाराज बारगजे यांच्या हस्ते होणार आहे.
हनुमान जन्मोत्सवानिमित्त गुरुवारी ता.२ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प आदीत्य महाराज झांबरे यांचे काल्याचे किर्तन होवुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तत्पुर्वी ५ ते ६ संगीत भजन होवुन जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच बुधवारी (ता. १) एप्रिल रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेमध्ये ग्रथदिंडी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या उत्सवात विविध भजन मंडळे, गायक-वादक तसेच महिला मंडळांचा सहभाग राहणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हनुमान मंदिर ट्रस्टच्यावतीने ट्रस्टचे विश्वस्त तथा स्वराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.प्रवीण होळकर यांनी केले आहे.

Back to top button