बीड

विज्ञानातील नवविचार आत्मसात करा, मराठीचा ठेवा वाचा – अरुण चिंतामणी

विज्ञानातील नवविचार आत्मसात करा, मराठीचा ठेवा वाचा – अरुण चिंतामणी

मराठी राजभाषा व विज्ञान दिन ल.ना.होशिंग विद्यालयात उत्साहात

जामखेड प्रतिनिधी –

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त संस्थेच्या ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज वार शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी राजभाषा दिन आणि विज्ञान दिनानिमित्त संयुक्तिक कार्यक्रम विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवी, सी.व्ही. रमण तसेच कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव अरुणशेठ चिंतामणी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे हे उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाचे माजी उपमुख्याध्यापक रमेश चांदेकर, पालक- शिक्षक संघाचे उपाध्यक्ष,विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले,पर्यवेक्षक अनिल देडे,कार्यालयीन अधीक्षक ईश्वर कोळी तसेच अध्यापक- प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी,पालक बंधू-भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव अरुण चिंतामणी बोलताना म्हणाले, विज्ञानातील नवविचार आत्मसात करतानाच मराठी साहित्याचा अनमोल ठेवा जतन व वाचनातून समृद्ध केला पाहिजे. भाषेचा विकास हीच खरी प्रगतीची दिशा आहे, असे प्रतिपादन करत त्यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून ज्ञानसंपन्न व संस्कारसंपन्न नागरिक बनावे, असे आवाहन केले.

यावेळी जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे बोलताना म्हणाले,विद्यार्थ्यांनी डोळसपणे जगत आपले व्यक्तिमत्त्व विशाल करावे. प्रचंड जिद्द व चिकाटीने अभ्यास केल्यास यश निश्चित आहे. विज्ञान हा मानवी जीवनाचा भक्कम पाया असून पूर्वजांच्या संशोधनामुळेच आजचे वैभव आपण अनुभवत आहोत. त्याचबरोबर मराठी साहित्य समृद्ध असून त्याचे सखोल वाचन व चिंतन करणे आवश्यक आहे.

यावेळी बोलताना प्राचार्य बाळासाहेब पारखे म्हणाले,विद्यार्थ्यांनी विज्ञान व साहित्य यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे प्रबोधन करण्यासाठी घेतलेल्या मेहनती बद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

यावेळी माजी उपमुख्याध्यापक रमेश चांदेकर बोलताना म्हणाले,मराठी भाषा आपली अस्मिता आहे, तर विज्ञान आपली प्रगतीची दिशा आहे. दोन्हींचा समतोल साधत विद्यार्थ्यांनी जिद्दीने व चिकाटीने वाटचाल केली तर यश निश्चित आहे.

ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान विभागाच्या प्राध्यापिका जी.आर.खके यांनी सांगितले की,विज्ञानाने केलेली प्रगती व शोध यांचा मानवी कल्याणासाठी वापर करावा.तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांपासून विद्यार्थ्यांनी सावध राहून स्वतः यशस्वी व्हावे.

यावेळी मराठी-विज्ञान दिनावर आधारित विद्यार्थी व विद्यालयातील सहकारी अध्यापकांनी विविध गुणदर्शनाचा सुंदर व प्रभावी कार्यक्रम घडवून आणला व उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षिका सुप्रिया घायतडक,वंदना आल्हाट,संगीता दराडे,पूजा भालेराव , प्रियांका सुपेकर,स्वप्नाली घाडगे, रेश्मा कारंडे, प्रभा आखाडे, स्वाती हंगे,शितल जगदाळे ,स्वाती गिरी, मोहिनी जाधव तसेच अध्यापक किशोर कुलकर्णी, साईप्रसाद भोसले राघवेंद्र धनलगडे , प्रल्हाद साळुंखे, बापू जरे,धिरज पाटील, लक्ष्मण सोळंके, स्वप्निल जाधव, पंकज पोकळे आदी अध्यापक-प्राध्यापक आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगत विज्ञान विभाग प्रमुख बबन राठोड व सूत्रसंचालन मराठी,एनसीसी विभागाचे विभाग प्रमुख पर्यवेक्षक अनिल देडे यांनी केले तर आभारप्रदर्शन समारंभ विभाग प्रमुख नरेंद्र डहाळे यांनी मानले.

Back to top button