बीड

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त बाणाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व धनगर समाज महिला अहिल्या आघाडीच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त बाणाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व धनगर समाज महिला अहिल्या आघाडीच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

महिला, युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- मिनाक्षीताई देवकते (डोमाळे)

बीड (प्रतिनिधी): स्त्री शक्तीचे, सुशासनाचे आणि लोककल्याणाचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती बाणाई महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. तसेच जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमात महिला भगिनी, युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बाणाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व धनगर समाज महिला अहिल्या आघाडीच्या अध्यक्षा तथा जयंती समितीच्या अध्यक्षा मिनाक्षीताई देवकते (डोमाळे) यांनी केले आहे.
दि.31 मे 2026 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती निमित्त बाणाई महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व धनगर समाज अहिल्या महिला आघाडीच्या वतीने शाहूनगर अंबिका चौक ते सिध्दीविनायक संकुलातील अहिल्यादेवी पुतळ्या पर्यंत भव्य रथ व घोडे यांच्या वर प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. वेगवेगळ्या महामानवांच्या वेशभूषा करून लहान मुले यात सहभागी होणार आहेत. तसेच महिला व युवतींसाठी रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे बक्षीस वितरण दि. 20 जूनला होणार आहे. तसेच गरजू महिलांना साडी वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती बाणाई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा तथा धनगर समाज महिला अहिल्या आघाडीच्या अध्यक्ष मिनाक्षीताई देवकते (डोमाळे) यांनी दिली आहे. यावेळी कावेरीताई जाधव, छायाताई सरोदे, शिवाजी चांगण, अण्णासाहेब मतकर, समीक्षाताई वाघमारे, कमलताई शीलाताई उजगरे, साळवे मॅडम यांची उपस्थिती होती.

Back to top button