जामखेडमध्ये अवधूत पवार यांच्या उपोषणाला सर्वपक्षीय पाठिंबा

जामखेडमध्ये अवधूत पवार यांच्या उपोषणाला सर्वपक्षीय पाठिंबा
उद्या जामखेड शहर कडकडीत बंदची हाक!
जामखेड प्रतिनिधी :जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी लगतच्या अतिक्रमण व अनियमिततेबाबत सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी दि.२४ फेब्रुवारी रोजी पासून उपोषणाला सुरुवात केली होती,आज उपोषणाचा दुसरा दिवस असून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सर्व पक्षीय नेते यांनी पाठिंबा दिला.यावेळी प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे व जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी उपोषणस्थळी भेट दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले,उपनगराध्यक्ष पोपट राळेभात,नगरसेवक ॲड.डाॅ.अरुण जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शहाजी राळेभात,मनसे नेते प्रदीप टापरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, शिवसेना तालुकाप्रमुख ॲड.मयुर डोके,भाजपा गटनेते तात्याराम पोकळे, युवा नेते विकास राळेभात, अमित चिंतामणी,नगरसेवक तथा प्राचार्य विकी घायतडक,युवक काँग्रेसचे राहुल उगले,पवन राळेभात,मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष अझहर काझी,अशोक शेळके,मुख्तार सय्यद , अर्जुन म्हेत्रे,संपत राळेभात, गणेश आजबे, अनिल सदाफुले, बजरंग डूचे,संजय डोके,दिपक घायतडक, नितीन ढेरे,डाॅ.प्रणव राळेभात, सचिन शिंदे, प्रा.शिवाजी भोसले आदींनी पाठिंबा दिला.
उद्या दिनांक २६ फेब्रुवारी रोजी जामखेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. शासनाकडून जो पर्यंत अतिक्रमण काढण्याची कार्यवाही शहरात,होत नाही तो पर्यंत बंद मागे घेतला जाणार नाही.याची सर्व व्यापारी व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे तसेच उपोषण सुरू राहणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी सांगितले.
चौकट
—————-
*अतिक्रमण हटविण्यासाठी अधिकाऱ्यांचे टोलवाटोलवी*
अतिक्रमण हटविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अधिकारी एस. बी चेमटे म्हणाले की, आमचा काही संबंध नाही. नगरपरिषदेने अतिक्रमण काढावेत तर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे म्हणाले की,आमची सर्व तयारी आहे पण राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार सहकार्य करत नाहीत. यामुळे जामखेड शहराचा विकास खुंटला आहे. अतिक्रमण नेमके कोणी काढावयाचे हाच प्रश्न निर्माण झाला आहे.



