बीड

कार्यशाळा आणि सराव परीक्षेमुळे घडले यश; आदित्यचे विद्यार्थी टीईटीत अव्वल

कार्यशाळा आणि सराव परीक्षेमुळे घडले यश; आदित्यचे विद्यार्थी टीईटीत अव्वल
—-
प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांचा सत्कार, तज्ज्ञ मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना झाला फायदा
प्रतिनिधी | बीड
आदित्य शिक्षण संस्थेअंतर्गत कार्यरत आदित्य अध्यापक महाविद्यालय व आदित्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी MH-TET 2025 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला नवा गौरव प्राप्त करून दिला. कार्यशाळा आणि सराव परीक्षेमुळे हे यश मिळाले. या यशामागे तज्ज्ञ मार्गदर्शक प्राध्यापकांचा मोठा वाटा आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
शेरिन बेगम सदुल्ला,मोटे आकांक्षा अशोक,घुमरे सुनंदा लक्ष्मणराव,बागलाने प्रतिभा,आफरीन बेगम कलीम शेख,सोनवणे महेश रामकिसन,घोडके अनिकेत नारद,संदिप कागदे,परजणे सुरेश लक्ष्मण,रोमन दीपक श्रीराम व शेंबडे अक्षय दादासाहेब या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2024-25 व 2025-26 मध्ये प्रवेश घेतल्यानंतर सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले.
संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा व डॉ. अदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, आंबेजोगाई येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. राजेश गोरे यांच्या उपस्थितीमध्ये विशेष टीईटी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दर महिन्याच्या बुधवारी नियमित सराव परीक्षा घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. प्राचार्य मनिषा बावणे, प्रा. बी. एस. जगताप, प्रा. आर. ए. कारगुडे, प्रा. आय. आर. सय्यद व प्रा. एम. सी. चावर यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. छात्रसेवा शिबिरे, सराव पाठ व विविध शाळांमधील अध्यापन उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली. याच सर्वसमावेशक प्रयत्नांचे फळ म्हणून विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षेत यश मिळवले.
—–
महाविद्यालयामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढला
टीईटीत परीक्षेत विद्यार्थांनी जेव्हा यश संपादन केले तेव्हा त्यांचे पालक घोडके नारद, रोमन श्रीराम, घुमरे लक्ष्मण, शेख कलीम व सोनवणे रामकिसन म्हणाले की, महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या टीईटी मार्गदर्शन कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला. नियोजनबद्ध अभ्यास पद्धती व सराव परीक्षेमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. आदित्य अध्यापक महाविद्यालय हे शिक्षक घडविणारे महाविद्यालय असल्याच्या प्रतिक्रीया पालकांनी व्यक्त केल्या.

प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थांचे यश
विद्यार्थांचे पालक दादासाहेब शेंबडे , लक्ष्मण परजणे  व  अशोक मोटे यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश मिळाल्याचे सांगत संस्थेचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Back to top button