सारोळा प्रशालेत कुसुमाग्रज वाचन अभियान व हिंद की चादर उपक्रम उत्साहात संपन्न…!

सारोळा प्रशालेत कुसुमाग्रज वाचन अभियान व हिंद की चादर उपक्रम उत्साहात संपन्न…!
जामखेड (प्रतिनिधी): शनिवार,दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा या ठिकाणी वाचन संस्कृती वृद्धंगीत करण्यासाठी कुसुमाग्रज वाचन अभियान तसेच श्री.गुरु तेजबहादूर साहेबजी यांच्या 350 वा शहिदी समागम शताब्दी निमित्त हिंद की चादर हे उपक्रम उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले.सदर कार्यक्रम प्रसंगी राजुरी केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय विक्रम बडे साहेब तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश मुळे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
यावेळी कुसुमाग्रज वाचन अभियान या अंतर्गत उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते ग्रंथाचे पूजन करून ग्रंथ दिंडी काढण्यात आली.कुसुमाग्रज वाचन अभियानाचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.उपस्थित मान्यवर यांचा प्रशालेच्या वतीने सन्मान करण्यात आला.यानंतर रिडिंग बेल, सारांश लेखन, आनंददायी शनिवार,विद्यार्थी गौरव,समृद्ध परिपाठ व वाचन चळवळ या उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली.प्रशालेतील वाचन कट्ट्यावर विद्यार्थी, शिक्षक यांनी अवांतर वाचन पुस्तकाचे वाचन करून सदर उपक्रमात सहभाग नोंदविला.
यावेळी आदित्य कृषी महाविद्यालय बीड या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे धनंजय भीमराव सातपुते यांनी त्यांचे आजोबा कै.माणिक यादव सातपुते यांच्या प्रथम पुण्यस्मरण प्रित्यर्थ सारोळा प्रशालेतील बाल वाचनालय करिता दहा हजार (10000/- ) रुपये किंमतीची अवांतर वाचनाची पुस्तके भेट देण्याचे जाहीर केले.
तसेच श्री गुरु तेजबहादूर साहेबजी यांच्या 350 वा शहिदी समागम शताब्दी निमित्त हिंद की चादर हे उपक्रम अंतर्गत आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
सदर कार्यक्रमासाठी राजुरी केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय विक्रम बडे साहेब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश मुळे, सारोळा प्रशालेचे मुख्याध्यापक माजीद शेख, पदवीधर शिक्षक सुरेश बर्वे ,राहुल लिमकर, उपाध्यापक प्रशांत होळकर सर, उपाध्यापिका शबाना शेख ,वृषाली खांदवे व अमृता रसाळ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते…!



