रायगड

वडवली पंचायत समिती गण ९३,निवडणुकीत मनसे पहिल्यांदाच रिंगणात.

वडवली पंचायत समिती गण ९३,निवडणुकीत मनसे पहिल्यांदाच रिंगणात.

विशेष प्रतिनिधी : नंदकुमार चांदोरकर

माणगाव तालुक्यातील वडवली पंचायत समिती गणं ९३, निवडणुकीच्या रिंगणात यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पहिल्यांदाच दमदार प्रवेश केला असून, या ऐतिहासिक निवडणुकीत मनसेचे उमेदवार महेश देवदास सावर्डेकर यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.
मनसेचे माणगाव तालुका अध्यक्ष चिमण रघुनाथ सुगदरे यांच्या सक्षम व मार्गदर्शक नेतृत्वाखाली मनसेने गावागावात संघटन मजबूत करत सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. विकासाभिमुख विचारसरणी, स्वच्छ प्रतिमा आणि तरुण नेतृत्वामुळे महेश सावर्डेकर यांना तरुणांसह महिला, शेतकरी व कामगार वर्गाचा मोठा पाठिंबा लाभत आहे.
स्थानिक पातळीवरील पाणीप्रश्न, रस्ते, रोजगार, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका मांडत मनसेने जनतेचा विश्वास संपादन केला आहे. प्रचारादरम्यान होत असलेल्या सभा, बैठका व जनसंपर्कातून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मनसेच्या विजयाची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.
वडवली पंचायत समिती गणं ९३,निवडणुकीत मनसेचा हा पहिलाच प्रयत्न असला, तरी जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Back to top button