बीड

ईगलवूड पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये ट्रॅडिशनल डे उत्साहात साजरा

ईगलवूड पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये ट्रॅडिशनल डे उत्साहात साजरा

माजलगाव / प्रतिनिधी
ईगलवूड पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट येथे दि. 23 जानेवारी 2026 रोजी ट्रॅडिशनल डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
विद्यार्थी साडी, धोतर, कुर्ता-पायजमा तसेच भारतातील विविध राज्यांच्या पारंपरिक पोशाखात सजले होते. रंगीबेरंगी वेशभूषेमुळे संपूर्ण महाविद्यालयीन परिसर सांस्कृतिक वातावरणाने नटून गेला होता.
कार्यक्रमादरम्यान पारंपरिक नृत्ये, गीत सादरीकरण व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या प्राचार्य वेळापुरे सर व शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांचे कौतुक करत भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
ट्रॅडिशनल डे निमित्ताने विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख जपण्याची व आनंदाने साजरा करण्याची संधी मिळाली.

Back to top button