बीड
वसंतदादा पाटील महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

पटोदा, दि. २६ रोजी येथील नवगण शिक्षण संस्था राजुरी (न.)संचलित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाविद्यालय स्थानिक विकास समितीचे सदस्य ह. भ. प.रंधवे बापू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम राख सर, उपप्राचार्य, डॉ. सतीश माऊलगे,उपप्राचार्य डॉ. अभय क्षीरसागर, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड कार्यालयीन अधिक्षक श्री. अशोक पवार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत संपल्यानंतर ‘सुजान- सजग नागरिकत्वाची ‘ शपथ सामूहिक रितीने देण्यात आली, त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागांच्या भितीपत्रकांचे प्रकाशन महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी छोटासा सांस्कृतिक देशभक्ती विषयक कार्यक्रम सादर करून या कार्यक्रमामध्ये रंगत आणली. प्रा. बलराम अविळे, प्रा. प्रदीप मांजरे इत्यादी प्राध्यापकांनीही देशभक्तीपर गीताचे गायन करून राष्ट्राभिमान व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पांडुरंग सुतार, व प्रा. कावेरी खुरणे यांनी केले. सांस्कृतिक विभागाच्या आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने प्रा.डॉ. देवानंद पुरी, प्रा. डॉ. विनोद पवार, प्रा. तानाजी आगळे, प्रा. डॉ. जगदीश कावरे प्रा. प्रदीप मांजरे, प्रा. नामदेव कळसकर इत्यादींनी कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आली होती. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती.