बीड
अजित दादाच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राने कणखर लेक गमावला :- राजेंद्र आमटे

अजित दादाच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राने कणखर लेक गमावला :- राजेंद्र आमटे
बीड जिल्ह्यातील विकासाच्या आशेचा किरण मावळला
बीड ( प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या जडणघडणीतील कणखर नेतृत्व कै.अजित दादा पवार यांच्या मुबई ते बारामती प्रवासात बारामती येथे विमान दुर्घटना मध्ये दुःखात निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
दादाच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राने कणखर लेक गमावला आहे,अजित दादा यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण राज्यांमध्ये दुःखाच्या डोंगर कोसळला आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नाला तडीस नेणारा एक कणखर पुत्र या महाराष्ट्रभूमीने गमावला आहे तसेच अजित दादा मुळे बीडकरांना एक विकास करण्याकरिता आशेचा किरण दिसत होता तो आशेचा किरणही आज मावळला आहे अजितदादा म्हणजे विकास, अजितदादा म्हणजे कणखरता; अजितदादा म्हणजे कामाचे पावती ही जी ओळख होती ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजित दादांनी निर्माण केलेली होती अजित दादा यांच्या अचानक जाण्यामुळे सर्वांना धक्का बसलेला आहे आणि बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना बीड जिल्ह्याचा विकास अजितदादाच करू शकतात हा एक आशेचा किरण माननीय अजितदादा बीडचे पालकमंत्री झाल्यापासून सर्वांना वाटत होता की बीडच्या विकासाची आशा आज अजित दादाच्या अचानक जाण्यामुळे मावळलेली आहे महाराष्ट्र भूमीने आपला कणखर पुत्र आज गमावला आहे अशा भावना शेतकरी हक्क मोर्च्याचे राजेंद्र आमटे यांनी व्यक्त केला



