बीड

वडवणीमध्ये प्रभू श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा हजारो भाविकांनी घेतले दर्शन

वडवणीमध्ये प्रभू श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा
हजारो भाविकांनी घेतले दर्शन
वडवणी, दि.६ (प्रतिनिधी):- शहराचे श्रद्धास्थान असणार्‍या वडवणी येथील श्रीराम मंदिरामध्ये आज श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळपासूनच भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. हजारो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी आयोजित विदर्भातील ह.भ.प. सोपान महाराज कन्हेरकर यांच्या किर्तनासाठी प्रचंड गर्दी झाली होती., महाप्रसाद आणि पालखी मिरवणुकीने जन्मोत्सवाची सांगता झाली.
वडवणी येथे श्रीराम जन्मोत्सव प्रचंड उत्साहामध्ये साजरा झाला. श्रीराम मंदिरात पहाटे अभिषेक करण्यात आला. सकाळपासूनच शहरातील भाविकांची दर्शनासाठी मंदिरामध्ये मोठी गर्दी होती. अकरा वाजता मंदिराच्या प्रांगणामध्ये विदर्भातील ह.भ.प.सोपान महाराज कन्हेरकर यांच्या किर्तनाला सुरूवात झाली. भर उन्हातही हजारो भाविकांनी किर्तनाचा लाभ घेतला. किर्तनाच्या शेवटी अनेक तरूणांनी व्यसनमुक्तीचा निर्णय घेतला. गुलालाची उधळण करत जन्मोत्सव साजरा झाला. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाआरतीनंतर शहरातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पालखी मिरवणुकीने जन्मोत्सवाची सांगता झाली.
———-चौकट——–
५० वर्षे किर्तनसेवेचे पूर्ण
शहरातील ह.भ.प.माऊली महाराज बेदरकर यांच्या वारकरी सांप्रदायातील कीर्तन सेवेला यंदा ५० वर्षे पूर्ण झाले. श्रीराम मंदिर देवस्थानच्या वतीने वारकरी सांप्रदायाची आयुष्यभर सेवा करणार्‍या ह.भ.प.माऊली महाराजांचा हृदय सत्कार करण्यात आला.
Back to top button