बीड

नगरसेविका नंदाताई होळकर यांच्या वतीने तिळगुळ-हळदी कुंकू समारंभाचे आयोजन

नगरसेविका नंदाताई होळकर यांच्या वतीने तिळगुळ-हळदी कुंकू समारंभाचे आयोजन

महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – नगरसेविका नंदाताई होळकर

जामखेड | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक सातच्या नगरसेविका सौ. नंदाताई प्रविण होळकर यांच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त तिळगुळ व हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० ते ९.०० या वेळेत पार पडणार आहे.
या कार्यक्रमासाठी जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.मकरसंक्रांतीचा सण सामाजिक सलोखा, आपुलकी व संस्कृतीचे प्रतीक असून महिलांमध्ये स्नेहभाव वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात महिलांना तिळगुळ व हळदी-कुंकू देऊन सणाचा आनंद साजरा करण्यात येणार आहे. असे यावेळी बोलताना नगरसेविका सौ.नंदाताई होळकर म्हणाले.

हा कार्यक्रम होळकर निवासस्थानी, तपनेश्वर गल्ली, जामखेड येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमासाठी परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन होळकर यांनी केले आहे.

Back to top button