बीड

इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियाडमध्ये किशोरी इंग्लिश स्कूलला तीन गोल्ड मेडल

इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियाडमध्ये किशोरी इंग्लिश स्कूलला तीन गोल्ड मेडल
—-
आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिक्षेत ३० विद्यार्थ्यांचा सहभाग, शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका
प्रतिनिधी | बीड
किशोरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियाड (IMO) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका वाजवला आहे. नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या या प्रतिष्ठित परीक्षेत शाळेतील एकूण ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे किशोरी इंग्लिश स्कूलचा शैक्षणिक दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून तब्बल ३ विद्यार्थ्यांनी या परिक्षेत गोल्ड मेडल पटकावले आहे.     इयत्ता पहिलीतील अनय कल्याणी आदित्य सारडा या विद्यार्थाने ९२.५० टक्के गुण मिळवत आंतरराष्ट्रीय स्तरावर १५ वा तसेच झोनल स्तरावर १५ वा क्रमांक पटकावला असून शाळेतून प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला आहे. इयत्ता पहिलीतीलच राघव संध्या सचिन खर्डेकर याने ८५ टक्के गुणांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर ११४ वा आणि झोनल स्तरावर १०१ वा क्रमांक मिळवत शाळेतून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी अनिका पूजा दीपक भल्ला हिने ८९.७० टक्के गुण मिळवत आंतरराष्ट्रीय स्तरावर ७५० वा आणि झोनल स्तरावर ५५० वा क्रमांक पटकावला असून शाळेतून प्रथम क्रमांक मिळवत शाळेच्या यशात मानाचा वाटा उचलला आहे. या यशाबद्दल शाळेच्या संचालिका डॉ. अदिती सारडा यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेच्या प्राचार्या मेघा बिर्ला तसेच गणित विषयाच्या शिक्षिका काजल मालपाणी यांच्या मार्गदर्शन व मेहनतीचे विशेष कौतुक करण्यात आले.या घवघवीत यशामुळे किशोरी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य, विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि शिक्षकांचे समर्पित योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळेच हे यश शक्य झाले आहे. भविष्यातही आमचे विद्यार्थी अशाच प्रकारे उत्कृष्ट यश संपादन करतील, याची आम्हाला खात्री आहे.
-डॉ. अदिती सारडा, संचालिका, किशोरी इंग्लिश स्कूल

Back to top button