बीड

आष्टीत श्रीराम कथेचे आ. सुरेश धस यांच्या संयोजकत्वाखाली जय्यत तयारी सुरू

आष्टीत श्रीराम कथेचे आ. सुरेश धस यांच्या संयोजकत्वाखाली जय्यत तयारी सुरू
श्रीराम कथेमुळे भक्ती,श्रद्धा आणि अध्यात्माचा जागर
आष्टी (प्रतिनिधी)
आमदार सुरेश धस प्रतिष्ठान यांच्या वतीने आष्टी येथे येत्या ११ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत होणाऱ्या भव्य श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू असून, संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून हा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम साकार होत आहे.
या श्रीराम कथेचे निरूपण देवदास स्वामी मठ, दादेगाव येथील परमपूजनीय महंत मंदार महाराज रामदासी करणार असून, कार्यक्रमासाठी आष्टी पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात १५०× ३०० फुटाचा भव्य मंडप उभारणी, ध्वनिव्यवस्था, प्रकाशयोजना तसेच भाविकांच्या बसण्याची आसन व्यवस्था अंतिम टप्प्यात असून
सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या असून, स्वागत, शिस्त, प्रसाद वाटप, वाहनतळ व्यवस्था, आरोग्य व स्वच्छता या सर्व बाबींचे नियोजन काटेकोरपणे केले जात आहे. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला निघणाऱ्या आकर्षक शोभायात्रेचीही तयारी देखील जोमात सुरू आहे.श्रीराम कथेमुळे आष्टीत भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा जागर होणार असून
भक्ती, उत्साह आणि अध्यात्माचा संगम अनुभवायला मिळणार आहे.
     दिनांक ११ ते १७ जानेवारी दरम्यान दररोज दुपारी १२.३० ते सायंकाळी ४  या वेळेत श्रीराम कथा होणार असून, मकर संक्रांतीच्या दिवशी (१४ जानेवारी) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत विशेष कथा आयोजित करण्यात आली आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने आष्टीसह परिसरातील २० ते २५ गावांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचा अंदाज असून, त्या अनुषंगाने सर्व सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे.
यावेळी आमदार सुरेश धस यांनी सांगितले की,
“श्रीराम कथेच्या माध्यमातून समाजात भक्ती, संस्कार व सद्विचारांचा प्रसार व्हावा, हा आमचा उद्देश आहे. सर्व भाविकांनी कुटुंबासह उपस्थित राहून या आध्यात्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन आ.सुरेश धस आणि मराठवाडा भूषण लोकनेते आ.सुरेश धस प्रतिष्ठानच्या संयोजन समितीने यांनी केले आहे.
Back to top button